जरांगेंची भाषा मराठा समाजाला आवडत नाही !- नितेश राणे, आमदार

मनोज जरांगे पाटील यांची राजकीय भाषा मराठा समाजाला आवडत नाही. त्यांनी मराठा आरक्षणावर बोलणे हिताचे आहे, असे प्रतिपादन भाजपचे आमदार श्री. नितेश राणे यांनी १४ ऑगस्ट या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना केले.

पोलीस भरतीत आर्थिकदृष्ट्या मागासांसाठीच्या आरक्षणात बीड जिल्ह्यातून मुसलमानांचीच भरती

ओ.बी.सी. आणि मराठा समाज यांच्यात भांडणे लावून तिसर्‍याच समाजाला लाभ देण्याचा प्रयत्न कोण करत असेल, तर आपण गप्प बसणार नाही, अशी चेतावणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठाणे येथे मनसैनिकांकडून उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर आक्रमण !

मनसैनिकांनी त्यांचा फलक फाडला. रस्त्यावर बांगड्यांचा खच पडला होता. ‘क्रियेची प्रतिक्रिया होते’, अशी प्रतिक्रिया या संदर्भात मनसेचे संदीप देशपांडे यांनी दिली.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असतांना मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अटकेचा आदेश दिला !

असा आणखी एक खळबळजनक आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी ‘ए.एन्.आय्.’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला आहे. महाविकास आघाडीच्या काळात मुख्यमंत्रीपदावर उद्धव ठाकरे होते.

Bangladesh Crisis : भारताने शेख हसीना यांना आश्रय देण्‍यावरून बांगलादेशाने विरोध करणे स्‍वाभाविक ! – बांगलादेश नॅशनल पार्टी

बांगलादेशात हिंदूंवर होणार्‍या आक्रमणांविषयी बांगलादेश नॅशनल पार्टी गप्‍प का आहे ? त्‍याने याविषयही बोलले पाहिजे !

Human Rights Watch : (म्‍हणे) ‘बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणामागे राजकीय कारण  !’ – ‘ह्यूमन राइट्‍स वॉच’च्‍या आशियातील उपसंचालिका मीनाक्षी गांगुली

मीनाक्षी गांगुली या हिंदु असण्‍यासोबत बंगालीही आहेत; मात्र त्‍या बंगाली हिंदूंच्‍याच विरोधात बोलून जिहाद्यांना पाठीशी घालून हिंदुद्रोह करत आहेत ! अशांना कधीतरी हिंदु म्‍हणता येईल का ?

भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांना उच्च न्यायालयाने खडसावले !

पुणे येथील पूजा चव्हाण हिच्या मृत्यूप्रकरणी तत्कालीन मंत्री संजय राठोड यांच्यावर गुन्हा नोंदवण्यासाठी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती.

सरकारला शेवटची संधी, आम्ही राजकारणात उतरलो तर हाल होतील ! – मनोज जरांगे यांची चेतावणी

विधानसभेत मराठ्यांची सत्ता येणार आहे. या निवडणुकीत सत्तापालट होणार आहे. आम्हाला राजकारणात उतरायचे नाही; मात्र सरकारने आता आमची मागणी मान्य न केल्यास दुसरा पर्याय नाही. ही सरकारला शेवटची संधी आहे.

माझ्यावर आरोप करण्याविषयी देवेंद्र फडणवीस आणि परमबीर सिंह यांच्यात वाटाघाटी ! – अनिल देशमुख, माजी गृहमंत्री

माझ्यावर आरोप करण्याविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यात वाटाघाटी झाली आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

Bangladesh PM Resigns : बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यागपत्र देऊन देश सोडला !

भारताच्या शेजारी असणार्‍या पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका आणि आता बांगलादेश येथील अस्थिर राजकीय स्थिती पहाता भारताला अधिक सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे.