बांगलादेशातील विद्यार्थी नेता आणि सरकारमधील सल्लागार आसिफ महमूद याचे विधान
ढाका (बांगलादेश) – माजी पंतप्रधान शेख हसीना सरकारविरुद्ध विद्यार्थ्यांच्या बंडाचा प्रमुख चेहरा असलेला २६ वर्षीय आसिफ महमूद विद्यार्थी नेत्याने म्हटले, ‘भाजप भारतात सरकार चालवत आहे. त्यात हिंदूंसाठी घोषणापत्र आहे, ज्याच्या आम्ही विरोधात आहोत. बांगलादेशातील लोकांना हिंदुत्व आवडत नाही.’ आसिफ सध्या बांगलादेशातील अंतरिम सरकारमध्ये सल्लागारही आहे. आसिफ याने बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर, विशेषत: हिंदूंवरील आक्रमणे, हे राजकीय सूत्र असल्याचा दावा केला होता.
भारतातील एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत आसिफ महमूद म्हणाला की,
१. भारतातील अनेक नेते बांगलादेशाविरुद्ध द्वेष पसरवत आहेत. आमचे लोक भारतावर नाराज आहेत; कारण भारत शेख हसीना यांना साहाय्य करत आहे. शेख हसीना तिथे मुक्काम करत भाषण देत आहेत. जर भारताने त्यांना परत पाठवले, तर बांगलादेशासमवेतचे संबंध सुधारतील.
२. वर्ष २०१९ मध्ये भारतात नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायदा संमत झाले. आम्ही त्याला विरोध केला. यामुळे भारतातून मोठ्या संख्येने स्थलांतरित मुसलमान बांगलादेशात परत येऊ शकतात. हे धोरण मुसलमानांच्या विरोधात आहे.
३. जे शेख हसीना सरकारसमवेत होते, त्यांच्या विरोधात आम्ही आहोत. हेच भारतद्वेषाचे कारण आहे. त्यामुळे बांगलादेशातील लोक भारतीय उत्पादनांवर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. शेख हसीना सत्तेत आल्यानंतर अवामी लीगच्या १० सहस्र लोकांना कारागृहात टाकण्यात आले. (याला म्हणतात अत्याचार ! ही बांगलादेशातील अंतरिम सरकारची हुकूमशाहीच होय ! – संपादक)
संपादकीय भूमिका‘भारताला बांगलादेशातील जिहादी आवडत नाहीत’, असे म्हटले, तर ते चुकीचे ठरू नये ! |