मध्यप्रदेशातील उज्जैननंतर इंदूर येथेही श्रीराममंदिरासाठी देणगी गोळा करण्यास निघालेल्या फेरीवर धर्मांधांकडून दगडफेक : १२ हून अधिक जण घायाळ

हिंदूंकडे डोळे वर करून बघण्याचेही धाडस धर्मांधांकडून होऊ नये, असा वचक सरकार आणि पोलीस यांनी निर्माण केला पाहिजे !

‘कालोत्सव अणि जत्रोत्सव यांमध्ये चालणारा जुगार बंद करा’, अशी सत्तरी तालुक्यातील नागरिकांची मागणी

अशी मागणी का करावी लागते ? पोलीस, प्रशासन आणि संबंधित देवस्थानचे व्यवस्थापन स्वतःहून जत्रोत्सवातील जुगार का बंद करत नाहीत ? जुगारवाल्यांच्या दहशतीपुढे प्रशासन नमते घेते का ?

ब्रिटनहून पुण्यात आलेले १०९ प्रवासी बेपत्ता

इंग्लंडहून १ डिसेंबरपासून पुण्यात आलेल्या प्रवाशांचा थांगपत्ता लागत नसल्याने पुणे महापालिकेने आता शहर पोलिसांकडे धाव घेतली आहे. ब्रिटनहून आलेल्या ५४२ प्रवाशांची सूची राज्यशासनाने पुण्याला दिली होती.

३१ डिसेंबरच्या अपप्रकारांना रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीची मोहीम !

३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्षारंभाच्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हुपरी (जिल्हा कोल्हापूर), अंबड (जिल्हा जालना), धारावी आणि मुंबई येथे निवेदन देण्यात आले.

३१ डिसेंबरला महाबळेश्‍वर आणि पाचगणीतील सर्व कार्यक्रमांना रात्री १० नंतर प्रतिबंध

कोरोनाच्या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी तसेच कायदा आणि सुव्यवस्था टिकून रहाण्यासाठी महाबळेश्‍वर आणि पाचगणी या ठिकाणी ३१ डिसेंबरच्या सर्व कार्यक्रमांना रात्री १० वाजल्यानंतर चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

कोरोना लसीच्या रजिस्ट्रेशनसाठी अनोळखी लोकांनी माहिती मागितल्यास देऊ नये !

नागरिकांनी असे भ्रमणभाष संपर्क, लिंक किंवा लघुसंदेश यांना प्रतिसाद देऊ नये. ठाणे सिटी पोलिसांनी ट्वीट करून ही सूचना दिली आहे.

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे भर रस्त्यात तरुणावर आक्रमण करून हत्या होत असतांना जनता निष्क्रीय !

ही स्थिती भारतियांना लज्जास्पद होय ! अशा घटनांच्या वेळी जनता पुढे न येण्याचे एक कारण पोलिसांकडून नंतर होणारा त्रास ! पोलीस जनतेचे मित्र नसल्याने जनताही त्यांना साहाय्य करण्यास पुढे येत नाही !

मुंबईमध्ये पित्याकडून मुलीवर बलात्कार, उज्जैन येथे गुन्हा नोंद

श्रेष्ठतम हिंदु संस्कृतीचे शिक्षण आणि त्यानुसार आचरण यातूनच नीतीमान समाज घडू शकतो !

कोरोनाकाळात नागरिकांना साहाय्य करणार्‍या पोलिसांचा युवासेनेच्या वतीने सन्मान

कोरोनाकाळात नागरिकांना साहाय्य करणार्‍या  पोलिसांचा युवासेनेच्या वतीने मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शाल आणि पुस्तके देऊन सन्मान.

काँग्रेसची ट्रॅक्टर रॅली पोलिसांना दिसली नाही का ? – रविकिरण इंगवले, शहरप्रमुख, शिवसेना

पदवीधर निवडणुकीत झालेले मेळावे, तसेच रॅलीमध्ये ट्रॅक्टरवर दिमाखात बसलेली नेतेमंडळी पोलीस प्रशासनाला दिसली नाही. शिवाजी पेठेत फिरंगाई प्रभागात झालेला मेळावा मात्र पोलिसांना दिसला आणि त्यांनी माझ्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद केला.