
कोल्हापूर, २९ डिसेंबर (वार्ता.) – कोल्हापूरमध्ये कोरोनाकाळात नागरिकांना साहाय्य करणार्या पोलिसांचा युवासेनेच्या वतीने उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शाल आणि पुस्तके देऊन सन्मान करण्यात आला. युवासेना जिल्हा प्रमुख श्री. मंजीत माने यांनी याचे आयोजन केले होते. यापुढील काळातही शिवसेना पोलीस बांधवांच्या सेवेसाठी अखंड कार्यरत असेल, असे श्री. मंजित माने यांनी या वेळी सांगितले. या प्रसंगी जुना राजवाडा पोलीस ठाणे, शाहूपुरी, राजारामपुरी, करवीर पोलीस ठाणे येथील पोलीस उपस्थित होते.
या वेळी शिवसेना संपर्क प्रमुख श्री. अरुण दूधवडकर, खासदार श्री. धैर्यशील माने, जिल्हाप्रमुख श्री. संजय पवार आणि श्री. विजय देवणे, उपजिल्हा प्रमुख श्री. सुजितभाऊ चव्हाण, माजी आमदार श्री. चंद्रदीप नरके, सर्वश्री सनराज शिंदे, वैभव जाधव, विराज पाटील यांसह अन्य उपस्थित होते.
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
सासष्टी तालुक्यातील १ कोटी चौरस मीटरहून अधिक भूमी ‘विकासनिषिद्ध क्षेत्र’ म्हणून घोषित
जंतरमंतरवरील ‘नौटंकी’ : ‘वोक टूलकिट’चाच आविष्कार !
‘नीट’ आंदोलनाच्या हेतूचे ‘तीन तेरा’ !
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !
Bihar NEET Protest : बिहारच्या पाटलीपुत्र आणि सिवान येथे आंदोलनकर्त्यांकडून पोलिसांवर दगडफेक : पोलीस अधीक्षक घायाळ