शेतकर्‍यांचे हित !

शेतकर्‍यांच्या आंदोलनात खलिस्तानी आणि माओवादी शक्ती बळ पुरवत असल्याची शक्यता आहे, अशी वृत्ते पुराव्यानिशी येत आहेत. हे धोकादायक आहे.

आयुर्वेदाला सर्वमान्यता आवश्यक !

केंद्रशासनाने आयुर्वेदाच्या प्रसारासाठी पदव्युत्तर आयुर्वेदीय वैद्यांना ५८ प्रकारची शस्त्रकर्मे करण्याची अनुमती दिली. केंद्रशासनाने एक चांगला निर्णय घेतलेला असतांना दुसरीकडे अ‍ॅलोपॅथीच्या डॉक्टरांनी मात्र याला विरोध दर्शवत नुकताच एक दिवसाचा देशव्यापी संप केला !

आता शेळ-मेळावली येथे आयआयटी प्रकल्प उभारा !

भाजपवर लोकांनी विश्‍वास दाखवला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना जर शेळ-मेळावली येथे आयआयटी प्रकल्प उभारायचा आहे, तर त्यांनी त्यासंबंधीची प्रक्रिया त्वरित चालू करावी, असे माझे आवाहन आहे.

गोवा मुक्तीदिन कार्यक्रमाला उपस्थित न रहाण्याविषयी आमदार विजय सरदेसाई यांचे राष्ट्रपतींना पत्र

गोवा शासन राज्याचा ६० वा गोवा मुक्तीदिन वर्षभर मोठ्या स्वरूपात साजरा करणार आहे. १९ डिसेंबर २०२० या दिवशी गोवा मुक्तीदिनाच्या कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची उपस्थिती लाभणार आहे. ‘गोवा फॉरवर्ड’चा हा कार्यक्रम मोठ्या स्वरूपात साजरा करण्यास विरोध आहे.

मतदारसूचीत घोळ झाल्याची विरोधकांची निवडणूक आयोगाकडे तक्रार

मतदारांना माहिती न देताच त्यांची नावे मतदारसूचीतून गाळली जात आहेत किंवा समाविष्ट केली जात आहेत. विशेषत: मुरगाव तालुक्यात हा प्रकार आढळून आला, अशी तक्रार ‘गोवा फॉरवर्ड’ आणि काँग्रेस या पक्षांनी गोवा राज्य निवडणूक आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे केली आहे.

कृषी विधेयकाला होणारा विरोध आणि त्याच्या विरोधातील अफवा चुकीच्या ! – खासदार नारायण राणे, भाजप

देशातील उत्पादित मालाला दुप्पट भाव मिळावा, तसेच शेतकरी आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हावा, यासाठी केंद्र सरकारने कृषी विधेयक संमत केले आहे. त्यामुळे त्याला होणारा विरोध चुकीचा आहे. या कायद्याच्या विरोधात पसरवल्या जाणार्‍या अफवा आणि केली जाणारी अपकीर्ती चुकीची आहे.

ई-कॉमर्स आस्थापने देशात चिनी साहित्यांची विक्री करतात ! – ‘कॅट’चा आरोप

ई-कॉमर्स आस्थापनांच्या या व्यापारामुळे पंतप्रधान मोदी यांच्या ‘लोकल फॉर वोकल’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या आवाहनाची खिल्ली उडवली जात आहे. त्यामुळेच या आस्थापनांवर सरकारचा कायदेशीर वचक असणे अतिशय आवश्यक !

देहली येथील शेतकरी आंदोलनामध्ये महिलांकडून ‘मोदी तू मर’ अशा प्रकारची घोषणाबाजी !

शेतकरी आणि त्याही महिलांकडून अशा प्रकारच्या घोषणा देण्यात येणे, हे भारतीय संस्कृतीला लज्जास्पद ! असे आंदोलन लोकशाहीला धरून आहे का ? सरकारने असे देशविघातक घटक शोधून त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक !

केंद्राचे नवीन कृषी कायदे रहित न करण्याच्या मागणीसाठी विरोधकांचा विधान परिषदेत गदारोळ

विधान परिषदेत विरोधकांनी विरोध करून सभागृहात गदारोळ केला.

शेतकरी आंदोलनाला खलिस्तान्यांचे समर्थन जाणा !

भारतातील कृषी कायद्यांचा विरोध करतांना भारतविरोधी गटाने वॉशिंग्टन (अमेरिका) येथील भारतीय दूतावासासमोर असलेल्या म. गांधी यांच्या पुतळ्यावर खलिस्तानी झेंडा टाकून त्याद्वारे गांधींचा तोंडवळा झाकून टाकला.