देहली येथील शेतकरी आंदोलनामध्ये महिलांकडून ‘मोदी तू मर’ अशा प्रकारची घोषणाबाजी !

  • शेतकरी आणि त्याही महिलांकडून अशा प्रकारच्या घोषणा देण्यात येणे, हे भारतीय संस्कृतीला लज्जास्पदच होय ! शेतकरी संघटनांची याविषयी स्पष्टीकरण दिले पाहिजे, असेच जनतेला वाटते !
  • असे आंदोलन लोकशाहीला धरून आहे का ? सरकारने आंदोलनाच्या आडून जे देशविघातक घटक कार्यरत आहेत, त्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक !
‘मोदी मर जा तू’; पंतप्रधानांच्या विरोधात शेतकरी आंदोलनात घोषणा

नवी देहली – देहलीच्या सीमेवर गेल्या १९ दिवसांपासून शेतकर्‍यांकडून आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाचे काही व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. अशाच एका व्हिडिओमध्ये काही महिला, ‘मोदी तू मर’, ‘शिक्षण विकून खाणार्‍या मोदी तू मर’, ‘रेल्वे विकून खाणार्‍या मोदी तू मर’, ‘देश विकून खाणार्‍या मोदी तू मर’ आणि ‘शेतकर्‍यांना धोका देणार्‍या मोदी तू मर’, अशा प्रकारच्या घोषणा देत असल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडिओ देहलीच्या कुठल्या सीमेवरील आहे, ते स्पष्ट नसले, तरी येथे अखिल भारतीय किसान सभा आणि कम्युनिस्ट पार्टीचे हातोडा असलेले चित्र असणारे फलक दिसत आहेत. अ.भा.किसान सभा ही साम्यवाद्यांची संघटना आहे. या फलकावरून ही घटना राजस्थानच्या घडसाना येथील असल्याचे म्हटले जात आहे. हा व्हिडिओ ट्वीट करून भाजपचे सरचिटणीस कुलजीतसिंह चहल यांनी म्हटले की, हे भारताचे शेतकरी होऊ शकत नाहीत. असे करण्यासाठी त्यांना कोण प्रायोजित करत आहेत ?

१. अशाच प्रकारचे काही अन्य व्हिडिओही सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहेत. एका व्हिडिओमध्ये काही आंदोनलकर्ते शेतकरी ‘जय हिंद’ आणि ‘भारत माता की जय’ बोलण्यास नकार देत आहेत. तसेच ‘केवळ ‘जो बोले सो निहाल’ आणि ‘अस्सलाम वालेकुम’ हेच आम्ही बोलणार’, असे ते म्हणत आहेत. या वेळी तेथे देहलीतील आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्लाह खान हेही दिसत आहेत.

 (सौजन्य : TIMES NOW)

२. ‘झी न्यूज’ या हिंदी वृत्तवाहिनीने काही दिवसांपूर्वी प्रसारित केलेल्या एका वृत्तामध्ये एक शीख आंदोलनकारी शेतकरी, ‘आम्ही जसे इंदिरा गांधी यांना ठार केले, तसेच मोदी यांनाही करू’, अशा शब्दांत धमकी देतांना दिसत होता.