६० वा गोवा मुक्तीदिन वर्षभर मोठ्या स्वरूपात साजरा करण्याच्या शासनाच्या निर्णयाला होणार्या विरोधाचे प्रकरण
पणजी, १५ डिसेंबर (वार्ता.) – गोवा शासन राज्याचा ६० वा गोवा मुक्तीदिन वर्षभर मोठ्या स्वरूपात साजरा करणार आहे. १९ डिसेंबर २०२० या दिवशी गोवा मुक्तीदिनाच्या कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची उपस्थिती लाभणार आहे. ‘गोवा फॉरवर्ड’चा हा कार्यक्रम मोठ्या स्वरूपात साजरा करण्यास विरोध आहे. या पार्श्वभूमीवर ‘गोवा फॉरवर्ड’चे आमदार विजय सरदेसाई यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना एक पत्र लिहून त्यांनी १९ डिसेंबर या दिवशी गोव्यात मुक्तीदिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये, असे आवाहन केले आहे.
ते म्हणाले, ‘‘कर्नाटकने म्हादईचे पाणी वळवळे आहे, तरी गोवा शासन याविषयी गंभीर नाही. गोवा शासन कोळसा प्रदूषण करणारे रेल्वेमार्ग दुपदरीकरण आदी प्रकल्प गोव्यात राबवत आहे. याला माझा विरोध आहे.’’
गोवा मुक्तीदिन सोहळा आयोजनाच्या उपसमिती बैठकीवर विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांचा बहिष्कार
पणजी – गोवा शासन ६० वा मुक्तीदिन मोठ्या स्वरूपात साजरा करत आहे. या अनुषंगाने गोवा मुक्तीदिन सोहळा आयोजनाच्या उपसमितीची १५ डिसेंबर या दिवशी बैठक झाली. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी या बैठकीवर बहिष्कार घातला. ते म्हणाले, ‘‘६० वा मुक्तीदिन मोठ्या स्वरूपात साजरा करण्यास माझा विरोध आहे.’’