
पणजी – मतदारांना माहिती न देताच त्यांची नावे मतदारसूचीतून गाळली जात आहेत किंवा समाविष्ट केली जात आहेत. विशेषत: मुरगाव तालुक्यात हा प्रकार आढळून आला, अशी तक्रार ‘गोवा फॉरवर्ड’ आणि काँग्रेस या पक्षांनी गोवा राज्य निवडणूक आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत ही तक्रार करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी ‘यात लक्ष घालू’, असे आश्वासन राजकीय पक्षांना दिले.
‘गोवा फॉरवर्ड’चा फोंडा गट विसर्जित

पणजी – ‘गोवा फॉरवर्ड’चे फोंडा येथील नेते राजेश शेट वेरेकर यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवून पक्षाचा फोंडा गट विसर्जित करण्यात आला आहे, तसेच राजेश शेट वेरेकर यांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. जि.पं. निवडणुकीत फोंडा तालुक्यातील कवळे, कुर्टी आणि प्रियोळ या मतदारसंघांत मगोपचे उमेदवार निवडून आले आहेत.
नेत्रदीपक रिंगण आणि बंधूभेटीनंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अन् जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पंढरपूरमध्ये आगमन !
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !