राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात होळीच्या पार्श्‍वभूमीवर जमावबंदी आदेश लागू

  • होळी खेळतांना अन्य धर्मियांच्या भावना न दुखावण्याचे आवाहन

  • भाजप आणि हिंदु संघटना यांच्याकडून विरोध

बाडमेर (राजस्थान) – येथील जिल्हाधिकारी लोकबंधू यांनी जिल्ह्यात होळीच्या पार्श्‍वभूमीवर कलम १४४ (जमावबंदी) लागू केले आहे. या आदेशात म्हटले आहे, ‘अन्य धर्मियांच्या भावना दुखावल्या जातील, अशा प्रकारे कुणीही होळी खेळू नये आणि रंग उडवू नये.’ या आदेशाला भाजप आणि हिंदु संघटना यांच्याकडून विरोध केला जात आहे. गेल्या वर्षी काँग्रेस सरकारकडून हिंदूंच्या सणांच्या वेळी अजमेरसह अनेक जिल्ह्यांत कलम १४४ लागू करण्यात आले होते.

१. या आदेशात म्हटले आहे की, अन्य धर्मियांच्या किंवा एखाद्या व्यक्तीच्या भावना दुखावल्या जातील, अशी गाणी कुणीही वाजवू नयेत आणि घोषणाबाजी करू नये, तसेच एखाद्या व्यक्तीवर तिच्या इच्छेविरुद्ध रंग टाकू नये, ज्यामुळे त्याच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील.

२. या आदेशाविषयी जिल्हाधिकारी लोकबंधू म्हणाले की, असे आदेश प्रत्येक सणाच्या वेळी काढले जातात. यात ५ पेक्षा अधिक व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊ नयेत. मद्यप्रशन करू नये. शस्त्रे बाळगू नयेत. वाद घालू नये, अशी बंधने असतात. अनेक वर्षांपासून असा आदेश दिला जात आहे.

३. राज्यातील विधानसभेतील विरोधी पक्षाचे उपनेते राजेंद्र राठोड यांनी या आदेशावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी राज्यातील काँग्रेस सरकारवर हा कलंक असल्याचा आरोप केला आहे. हा विषयी राठोड यांनी विधानसभेतही हे सूत्र उपस्थित करत ‘सरकारने यावर उत्तर दिले पाहिजे’, अशी मागणी केली.

(सौजन्य : IndiaTV) 

संपादकीय भूमिका

  • काँग्रेसचे राज्य म्हणजे पाकिस्तानी राजवट ! आणखी किती दिवस हिंदू राजस्थानमध्ये काँग्रेसला राज्य करू देणार आहेत ?
  • अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळी कधी अशी बंदी घातली जाते का ?