राहुल गांधी यांचे आतंकवाद्यांशी संबंध !

राहुल गांधी यांच्या आरोपाला मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे प्रत्युत्तर

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे प्रत्युत्तर

पणजी, ५ मार्च (वार्ता.) – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे केंब्रिज, इंग्लंड येथे झालेले व्याख्यान हे ‘मेड इन चायना’ (चीनने तयार केलेले) असल्याचे भासते. चीनचे कौतुक आणि भारतावर टीका करणारे भाषण म्हणजे भारतीय लोकशाहीवरील एक आक्रमण आहे. राहुल गांधी यांचे आतंकवाद्यांशी संबंध आहेत, अशी टीका मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नुकतेच केंब्रिज येथे एक व्याखान दिले. यामध्ये राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका करतांना स्वतःसह अनेक नेत्यांवर पाळत ठेवली जात असल्याचा गंभीर आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सलग ६ ट्वीटच्या माध्यमातून राहुल गांधी यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ट्वीटमध्ये पुढे म्हणतात,

१. काँग्रेस पक्ष आणि राजीव गांधी फाऊंडेशन यांना चीनकडून मिळालेल्या देणग्यांना न्याय देण्याचे काम राहुल गांधी करत आहेत का ? राहुल गांधी यांनी विदेशी भूमीत जाऊन भारताची प्रतिमा मलीन केली आहे.

२. राहुल गांधी यांनी पुलवामा आतंकवादी आक्रमणाला ‘कार बाँब’ असे संबोधून पुन्हा एकदा त्यांनी त्यांचे आतंकवाद्यांशी संबंध असल्याचे उघड केले आहे.

३. राहुल आणि काँग्रेस यांना पाकिस्तानविषयी ‘सॉफ्ट कॉर्नर’  (नरमाईचे धोरण) आहे. राहुल गांधी यांचे वक्तव्य म्हणजे शूर सैनिक आणि हुतात्मा यांना अपकीर्त करण्याचा प्रकार आहे.

४. राहुल गांधी यांच्या भाषणामुळे त्याचे चीन आणि ‘कम्युनिस्ट’ नेते यांच्यांवरील त्यांचे प्रेम पुन्हा एकदा दिसून आले आहे.


मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या टीकेला प्रत्त्युतर देतांना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले,

‘‘महात्मा गांधी, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची आतंकवाद्यांनी हत्या केली आहे. हाच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राहुल गांधी यांचा आतंकवाद्यांशी संबंध आहे.’’ (महात्मा गांधी यांची हत्या करणारे नथुराम गोडसे आतंकवादी नव्हते ! त्यांची आतंकवाद्यांशी तुलना करणार्‍यांच्या बुद्धीची कीव करावी वाटते ! – संपादक)


हे वाचा आणि पहा –

माझ्या भ्रमणभाषची हेरगिरी केली जाते ! – राहुल गांधी यांचा केंब्रिज विश्‍वविद्यालयात दावा
https://sanatanprabhat.org/marathi/658911.html

THIS IS BETRAYAL OF BHARAT 

__________________________________________