|
वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील बनारस हिंदु विश्वविद्यालयामध्ये होळी खेळण्यावर बंदी घालण्यात आली आहे. विश्वविद्यालयाच्या प्रशासनाकडून हा आदेश देण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई करण्याचेही यात म्हटले आहे. या आदेशाला विरोध केला जात आहे. ३ मार्च २०२३ या दिवशी विद्यार्थ्यांनी विश्वविद्यालय परिसरात होळी साजरी केली. या वेळी ‘डिजे’ (वाद्यवृंद) लावण्यात आला होता, तसेच एकमेकांवर रंग उधळण्यात येत होते. या पार्श्वभूमीवर या विश्वविद्यालयात इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आल्याची छायाचित्रे सामाजिक माध्यमांतून प्रसारित करून होळी न खेळण्याच्या आदेशाला विरोध करण्यात येत आहेत.
BHU में होली खेलने पर लगा प्रतिबंध तो वायरल होने लगा इफ्तार का फोटो, VC से सवाल कर रहे लोग https://t.co/ExZ30V5hDA
— News 4 Social (@newsforsocial) March 4, 2023
१. होळी न खेळण्याच्या आदेशाला विद्यार्थी संघटना विरोध करत आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष अभय सिंह यांनी म्हटले की, बनारस हिंदु विश्वविद्यालय देशातील प्रमुख शैक्षणिक संस्थांपैकी एक आहे. जर येथे विद्यार्थ्यांना होळी खेळण्यास दिली जाणार नाही, तर अन्य कुठे दिली जाणार ?
इफ्तार आयोजित करने वाले BHU में होली खेलने पर रोक, विरोध में छात्र-छात्राओं ने DJ लगाकर खूब उछाले रंग: जमकर हुई कुर्ताफाड़ होली#BHU #Holi2023 #Holi https://t.co/mNhrb1SRbh
— ऑपइंडिया (@OpIndia_in) March 3, 2023
२. विश्वविद्यालयाचे उपकुलगुरु प्रा. सुधीर जैन यांनी २६ एप्रिल २०२२ या दिवशी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. यावरून विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, विश्वविद्यालयाच्या परिसरात इफ्तार पार्टी आयोजित केली जाते, तर होळी का नाही ?
बनारस हिंदु विश्वविद्यालयाने काढलेले परिपत्रक –
संपादकीय भूमिकाजर हिंदूंच्या सणावर बंदी घालायची असेल, तर अन्य धर्मियांच्या सणांवर ती घातली पाहिजे ! नावात ‘हिंदु’ शब्द असतांना याउलट नियम विश्वविद्यालयाकडून घातला जात असेल, तर त्याला विरोध होणारच ! |