अल्पसंख्यांकांची ढाल आणि योगींची कारवाई !

राजू पाल आणि उमेश पाल (फाइल फोटो)

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रयागराज येथे उमेश पाल यांच्या हत्या प्रकरणावर विधानसभेत बोलतांना माफियांना भुईसपाट करण्याची भूमिका मांडली. ज्या पद्धतीने उमेश पाल यांची २४ फेब्रुवारी या दिवशी भर रस्त्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, त्या वेळी आक्रमणकर्त्यांनी बाँबही फेकले. या माफियागिरीला रोखण्याचे दायित्व शेवटी मुख्यमंत्र्यांच्या खाद्यांवर आहे. ही सर्व घटना ‘सीसीटीव्ही कॅमेर्‍या’मध्ये चित्रित झाली आहे. ज्या पद्धतीने ही हत्या करण्यात आली, त्यावरून गुन्हेगारांना पोलीस आणि प्रशासन यांचे भय वाटत नसल्याचे लक्षात येते. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी योगी आदित्यनाथ यांनी कठोरात कठोर पाऊल उचलणे अत्यावश्यकच आहे. या घटनेतील आरोपी आणि त्यांना सहकार्य करणारे या सर्वांची घरे बुलडोझरने पाडण्याची कारवाई उत्तरप्रदेश शासनाने चालू केली आहे. अशा २० जणांची सूची पोलिसांनी सिद्ध केली असून त्यांच्या घरांवर बुलडोझर चालवण्यात येणार आहे. याविषयी एम्.आय.एम्. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांसह काही मुसलमान नेत्यांनी उत्तरप्रदेशमध्ये मुसलमानांना लक्ष्य केले जात असल्याची कोल्हेकुई चालू केली. काँग्रेसच्या गोटातील काहीजण आणि काही पुरोगामी मंडळी यांनी याविषयी योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका चालू केली.

उमेश पाल यांची २४ फेब्रुवारी रोजी हत्या करण्यात आली

योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या कारवाईविषयी ही मंडळी बोलतात; परंतु ज्या निर्घृणतेने उमेश पाल यांची हत्या झाली, त्याविषयी मात्र कुणीही बोलायला सिद्ध नाही. ‘मुसलमानांना लक्ष्य केले जाते’, अशी ओरड केली जाते, तेव्हा ‘गुन्हे करणारेही मुसलमान होते’, याकडे मात्र ही मंडळी सोयीस्कररित्या दुर्लक्ष करतात. ‘धर्मबांधव’ म्हणून मुसलमानांवर होणार्‍या कारवाईविषयी ओवैसी यांना दुःख वाटणे स्वाभाविक आहे; परंतु खरेच जर धर्मबांधवांविषयी एवढी कणव वाटत असेल, तर ते अमानुषपणे हत्या करणार्‍यांना परावृत्त का करत नाहीत ? मुसलमानांच्या धर्मांध कारवाया रोखण्यासाठी प्रयत्न करायचे नाहीत; मात्र या कारवायांसाठी त्यांच्यावर कठोर कारवाई करायला प्रारंभ झाला की; मात्र ओरड करायची. ‘लोकशाही’, ‘राज्यघटना’, ‘धर्मनिरपेक्षता’ या शब्दांचा उपयोग करून राष्ट्रहिताच्या गप्पा मारायच्या; परंतु राष्ट्र आणि समाज विघातक कृत्ये करणार्‍या मुसलमानांवर कारवाई केल्यावर ‘अल्पसंख्यांक’ म्हणत ऊर बडवायचे, हा यांचा दुटप्पीपणा होय. मुसलमान देशाच्या स्वातंत्र्यापासून ‘अल्पसंख्यांक’पणाची ढाल वापरत आले आहेत. ‘अल्पसंख्यांक’ म्हणून मुसलमानांविषयी जाणीवपूर्वक सहानुभूती निर्माण करण्याचे काम आतापर्यंतच्या काँग्रेस सरकारने केले आहे; परंतु याचा दुष्परिणाम संपूर्ण देशाला भोगावा लागत आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

उमेश पाल यांची हत्या समाजवादी पक्षाचे नेते अतीक अहमद यांच्या आदेशावरून झाल्याचे पोलीस अन्वेषणात उघड झाले आहे. अतीक अहमद सध्या कारागृहात आहेत. कारागृहातून उमेश पाल यांच्या हत्येचा कट रचण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी अतीक अहमद यांची पत्नी, ३ मुले आणि अन्य काही जणांवर गुन्हा नोंदवला आहे. यापूर्वी अतीक अहमद यांच्या २ मुलांवरच गुन्हा नोंदवण्यात आला; मात्र अतीक यांचा तिसरा मुलगा असद हाही उमेश पाल यांच्या हत्येत सहभागी असल्याचे ‘सीसीटीव्ही फुटेज’ प्राप्त झाले आहे. यामध्ये असद आणि अन्य आरोपी सराईत गुन्हेगाराप्रमाणे गोळीबार करत आहेत. ‘असे लोक केवळ मुसलमान आहेत, म्हणून त्यांचा गुन्हा सौम्य होतो का ?’, हा प्रश्न ओवैसी आणि त्यांची बाजू घेणार्‍या मुसलमान नेत्यांना विचारला पाहिजे.

…म्हणून गुन्हा सौम्य होतो का ?

वर्ष १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बाँबस्फोटाच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी सर्व बाँबस्फोट हिंदूबहुल भागात झाले असूनही आणखी एक बाँबस्फोट मुसलमानबहुल भागात झाल्याची खोटी माहिती दिली. मुसलमानांना ‘अल्पसंख्यांक’ म्हणून पाठीशी घालण्यामुळेच मुसलमानांचे गुन्हेगारीकरण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे यापुढे ‘अल्पसंख्यांक’ म्हणून सहानुभूती देण्याचे उद्योग बंद करणे आवश्यक आहे. योगी आदित्यनाथ यांनी ज्या पद्धतीने माफियांच्या घरांवर बुलडोझर फिरवले, तशी कारवाई माफियागिरी रोखण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. मुलायमसिंह यादव यांच्या काळातील उत्तरप्रदेश आणि लालूप्रसाद यादव यांच्या काळातील बिहार यांची ओळख ‘गुंडाराज’ म्हणून निर्माण झाली. महाराष्ट्रात नोकरीसाठी येणार्‍या नागरिकांमध्ये उत्तरप्रदेश आणि बिहार या राज्यांतील नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. या राज्यांमध्ये नागरिकांना पुरेसा रोजगार उपलब्ध झाला असता, तर त्यांच्यावर नोकरीसाठी अन्य राज्यात विस्थापित होण्याची वेळ आली नसती. त्यामुळे उत्तरप्रदेशचा विकास करायचा असेल, तर मागील अनेक वर्षे पोसण्यात आलेला गुंडाराज संपवण्याचे शिवधनुष्य योगींना पेलावे लागेल.

त्यामुळे अन्य कुणी कितीही टीका केली, तरी ‘माफिया आणि धर्मांध यांना बुलडोझरचीच भाषा कळते’, हे योगी चांगल्या प्रकारे जाणून आहेत. योगी आदित्यनाथ हे जी कृती आता करत आहेत, ती आधीच्या शासनकर्त्यांनी केली असती, तर उत्तरप्रदेशमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात माफियाराज वाढला नसता. योगी आदित्यनाथ यांना उत्तरप्रदेशमधील जनतेने दुसर्‍यांदा निवडून दिले आहे. त्यामुळे मुसलमान नेते किंवा पुरोगामी यांना काय वाटते ? यापेक्षा तेथील जनतेला योगी आदित्यनाथ यांची कारवाई राज्याच्या हिताची वाटते, हे महत्त्वाचे आहे. ‘दुष्टांना दाखवलेला मानवतावाद हा नेहमी सज्जनांच्या जिवावर उठतो’, हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे धर्मांध आणि त्यांचे हितसंबंधी यांना मानवता दाखवण्याऐवजी ते ज्यांना पीडित करतात, त्यांना दाखवणे योग्य नाही का ?

‘अल्पसंख्यांक’पणाच्या नावाखाली मुसलमानांची धर्मांधता सौम्य करण्याचा कथित निधर्मीवाद्यांचा डाव लक्षात घ्या !