(म्हणे) ‘हिंदु राष्ट्रचा आग्रह धरणे म्हणजे कायदाद्रोह !’ – रियाझ फरंगीपेठ, सोशल डेमोक्रॅटिक ऑफ इंडियाचे नेते

सोशल डेमोक्रॅटिक ऑफ इंडियाचे नेते रियाझ फरंगीपेठ यांचा बेळ्तंगडी येथील ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ सभेला विरोध

रियाझ फरंगीपेठ

मंगळुरू (कर्नाटक) – सनातन संस्थेकडून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदु राष्ट्र जनजागृती सभा अभियान दक्षिण कन्नड जिल्हात विविध ठिकाणी करण्यात येत आहे. (हिंदु जनजागृती समिती विविध ठिकाणी ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ सभा  आयोजित करते. ज्यांना ‘कोणती संघटना हे आयोजित करते ?’, तसेच सभेचे नावही नीट ठाऊक नाही, ते याला विरोध करत आहेत ! – संपादक) ५ मार्च या दिवशी बेळ्तंगडी येथे असाच एक कार्यक्रम आयोजित करून चिथावणीखोर भाषण करून धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सनातन संस्थेने केले आहे, असा आरोप मंगळुरू येथील सोशल डेमोक्रॅटिक ऑफ इंडियाचे (एस्.डी.पी.आय.चे) नेते रियाझ फरंगीपेठ यांनी केला आहे. त्यांचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. (जर असे असते, तर एव्हाना पोलिसांत तक्रार आली असती किंवा पोलिसांनी गुन्हा नोंदवला असता;मात्र असे काहीच झालेले नाही, याचाच अर्थ रियाझ खोटे आरोप करत आहेत, हेच स्पष्ट आहे ! – संपादक)

सौजन्य न्यूज कर्नाटक 

रियाझ फरंगीपेठ यांनी केलेली हिंदुद्वेषी विधाने !

१. धर्मनिरपेक्ष असणार्‍या या देशात अशा प्रकारे एका धर्माचे राष्ट्र स्थापन करण्याचा आग्रह धरणारी सभा राज्यटनाविरोधी आहे. कायद्याबाह्य कृती आहे. (हिंदु जनजागृती समितीने अशा सभा देशभरात अनेक ठिकाणी घेतल्या आहेत. या सभांमुळे कुठेही राज्यघटनाविरोधी कृती झालेली नाही. असे असतांना केवळ हिंदुद्वेषापोटीच हा आरोप करण्यात येत आहे, हे स्पष्ट आहे ! – संपादक) म्हणून जिल्हा प्रशासन आणि पोलीस यांनी हिंदु राष्ट्र जनजागृती सभा आयोजित करत असलेल्या सनातन संस्थेचा पदाधिकारी, तसेच संघटक यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी विनंती करत आहोत.

२. हा संवेदनशील विषय असल्याने भारतात असे कुकृत्य करणार्‍यांच्या विरोधात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेनेही हस्तक्षेप करून सनातन संस्थेच्या पदाधिकार्‍यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा हिंदु राष्ट्र स्थापनेचा मागे असलेल्या व्यक्तींना शोधून काढून देशात शांतता राखावी, अशी विनंती करत आहे. (बिहार येथे पंतप्रधान मोदी यांचा हत्येसाठी करण्यात आलेल्या बाँबस्फोटांच्या प्रकरणी स्वतः रियाझ यांची राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून चौकशी झाली आहे. अशांनी अशा प्रकारचा आरोप करणे हास्यास्पदच होय ! – संपादक)

३. जिल्हा प्रशासन आणि पोलीस यांनी कारवाई केली नाही, तर एस्.डी.पी.आय. रस्त्यावर उतरून विरोध करील. आम्ही भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यास देणार नाही. सर्व धर्मांतील लोक एकत्रीत रहाणे, हेच या देशाचे सौंदर्य आहे. (असे आहे, तर प्रथम फरंगीपेठ यांनाच कारागृहात टाकले पाहिजे; कारण ते ज्या पक्षाशी सलग्न आहेत, तो बंदी घालण्यात आलेल्या पी.एफ्.आय.शी निगडित आहे आणि या संघटनेला भारताला इस्लामी देश बनवायचे आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका 

हिंदु राष्ट्राची मागणी करणे, हा राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे. त्याला कायदाद्रोह म्हणणे हाच कायदाद्रोह आहे !