डेन्मार्कमध्ये इजिप्त आणि तुर्कीये दूतावासांसमोर कुराण जाळले !

डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन येथे २५ जुलै या दिवशी तिसर्‍यांदा इजिप्त आणि तुर्कीये दूतावासांसमोर कुराण जाळण्यात आले. या घटनेवर जगभरातील इस्लामी देशांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

कॅनडा येथे चारचाकी गाडीच्या चोरीला विरोध करणार्‍या हिंदु विद्यार्थ्याची हत्या

टोरंटो येथे चारचाकी वाहनाची चोरी करण्यास विरोध केल्याने गुरविंदर नाथ या २४ वर्षीय भारतीय विद्यार्थ्यावर आक्रमण करण्यात आले. यात त्याचा मृत्यू झाला. हा विद्यार्थी महाविद्यालयातील सुटीच्या काळात पिझ्झा वितरणाचे काम करत होता.

ज्ञानवापीच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून  २६ जुलैपर्यंत स्थगिती !

सर्वेक्षणाचे हे काम आता स्थगित झाले असले, तरी त्याला पुन्हा अनुमती मिळाल्यास ते चालू करण्यात येणार आहे. केवळ वैज्ञानिक सर्वेक्षण असेल, ते लवकर पूर्ण होऊ शकते; मात्र जर खोदकाम करायचे असल्यास त्याला अधिक काळ लागू शकतो.

चंद्रपूर येथे पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्या बैठकीला उलगुलान संघटना आणि आंबेडकरवादी संघटना यांचा विरोध !

चंद्रपूर येथील अग्रसेन भवन परिसरात २३ जुलै या दिवशी पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्या नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते; मात्र भिडेगुरुजी यांचा चंद्रपूर जिल्हाप्रवेश आणि बैठक यांना उलगुलान संघटना आणि आंबेडकरवादी संघटना यांनी तीव्र विरोध केला.

मोपा, पेडणे येथे सनबर्न कार्यक्रम घेण्यास अनुज्ञप्ती देणार नाही ! – आमदार प्रवीण आर्लेकर, भाजप, गोवा 

पर्यटनाला चालना देतांना अमली पदार्थांच्या व्यवहारांना चालना मिळेल, असे कार्यक्रमही टाळले पाहिजेत. शासनाने चांगल्या मार्गाने महसूल मिळवण्याचा प्रयत्न केल्यास देवही त्यांना सहकार्य करील, यावर श्रद्धा ठेवावी !

बांगलादेशात पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात विरोधी पक्षांकडून मोर्चे !

गलादेशचा प्रमुख विरोधी पक्ष ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ या पक्षाने या मोर्च्यांचे आयोजन केले होते. विरोधी पक्षांकडून सत्ताधारी पार्टी ‘बांगलादेश आवामी लीग’वर भ्रष्टाचार आणि मानवाधिकाराचे हनन केल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

‘जय श्रीराम’ अशी अक्षरे असलेली भगवी पट्टी गळ्यात घालणार्‍या विद्यार्थ्यास शिक्षकाने वर्गाबाहेर काढले !

निधर्मी शिक्षण पद्धतीमुळे हिंदुबहुल देशात ‘जय श्रीराम’ला शिक्षकांकडून विरोध केला जातो, तर त्याच वर्गातील ‘हिजाब’ घातलेल्या मुसलमान विद्यार्थिनींना मोकळीक दिली जाते ! अशा शिक्षकावर शाळा प्रशासनाकडून कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे !

इराकमध्ये रस्ता रुंदीकरणासाठी ३०० वर्षे जुनी मशीद पाडली !

केवळ इराकच नव्हे, तर इस्लामचा केंद्रबिंदू असणार्‍या सौदी अरेबियामध्येही विकासकामांच्या आड येणार्‍या मशिदी पाडल्या जातात. भारतात मात्र बेकायदेशीर मशिदी पाडण्याची प्रशासनाची सिद्धता नसते, हे संतापजनक !

कॅनडाने तेथील भारतीय राजनैतिक अधिकार्‍यांच्या संरक्षणाकडे लक्ष द्यावे ! – भारत

भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी त्यांच्या इंडोनेशियामधील दौर्‍यात कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री मेलानी जोली यांची भेट घेतली. या वेळी जयशंकर यांनी कॅनडामधील भारतीय राजदुतांचे संरक्षण सुनिश्‍चित करण्याच्या सूत्राकडे जोली यांचे लक्ष वेधले.

सिंधुदुर्ग : प्राथमिक शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षक नेमण्यास वाढता विरोध

राज्यात अनेक डी.एड्. आणि बी.एड्. पदवीधारक बेरोजगार असतांना प्राथमिक शाळांमधून सेवानिवृत्त शिक्षकांना नेमण्याचा निर्णय अनाकलनीय आहे. विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने, तसेच नवीन शिक्षक भरती होईपर्यंत या बेरोजगार युवकांना संधी मिळावी.