भारताने ब्रिटीश उच्चायुक्तालयाच्या सुरक्षाव्यवस्था घटवली !

देहली येथील ब्रिटीश उच्चायुक्तालयाच्या बहेरील बॅरिकेड्स (मार्गात अडथळे निर्माण करण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य) पोलिसांनी हटवले. काही दिवसांपूर्वी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर खलिस्तानवाद्यांनी आक्रमण केले होते.

लक्ष्मणपुरी आणि कानपूर येथे विविध ठिकाणी समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांचे मार्गदर्शन

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तरप्रदेशमध्ये ‘हलालमुक्त भारत अभियान’ राबवण्यात आले. या अभियानाचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत . . .

काँग्रेसचा राजकीय अंत आवश्‍यक !

काँग्रेसने यापूर्वी श्रीरामाचे अस्‍तित्‍व नाकारत रामसेतू तोडण्‍याचा घाट घातला. हेही लक्षात घेत हिंदूंच्‍या देवतांच्‍या अवमानाच्‍या विरोधातही कठोर होत त्‍यांच्‍याविषयी अधिकाधिक माहिती शाळा आणि महाविद्यालये यांतून शिकवणे आवश्‍यक आहे. तरच पुढच्‍या पिढीमध्‍ये देवतांविषयी अधिक भाव निर्माण होईल.

गदारोळामुळे संसदेचे कामकाज दुपारपर्यंत स्थगित !

राहुल गांधी यांनी लंडनमध्ये लोकशाहीचा अवमान करणारे विधान केल्याच्या प्रकरणी क्षमा मागावी, अशी मागणी लोकसभेत सत्ताधारी पक्षाच्या खादारांकडून करण्यात आल्याने त्याला विरोधी पक्षांकडून विरोध करण्यात आला.

गोवा : कुळे ते वास्को रेल्वे दुपदरीकरणासाठी भूसंपादनाची वाट मोकळी

या प्रकल्पाला विरोध करतांना नागरिकांनी एकूण २६ आक्षेप नोंदवले होते. यातील १० आक्षेप थेट फेटाळण्यात आले, तर उर्वरीत १० आक्षेप फेटाळण्यापूर्वी सुनावणी घेण्यात येऊन ‘हे आक्षेप सक्षम प्राधिकरणाच्या कक्षेत नाहीत’, असे कारण देण्यात आले.

ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया) येथे खलिस्तानाठी करण्यात आलेल्या मतदानाचा फज्जा !

ब्रिस्बेन येथे १९ मार्च या दिवशी खलिस्तानसाठी ‘जनमत संग्रह २०२०’ (शिखांसाठी स्वतंत्र देश बनवण्यासाठी मतदान घेणे) नावाने मतदान घेण्यात आले; मात्र यात केवळ १०० शिखांनीच मतदान केल्याचे समोर आले आहे.

मेहबूबा मुफ्ती यांच्याकडून शिवलिंगावर जलाभिषेक !

निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांनी अशांना धर्मनिरपेक्षतेचे डोस न पाजल्याचाच हा परिणाम आहे ! आता तरी त्यांना हा डोस पाजण्यात येईल का ? कि केवळ हिंदूंनीच धर्मनिरपेक्षतेचे पालन करत आत्मघात करून घेत रहायचा ?

(म्हणे) ‘पंतप्रधान मोदी यांना राजकीयदृष्ट्या संपवले, तर भारताची भरभराट होईल !’ – काँग्रेसचे नेते  सुखजिंदर सिंह रंधावा यांचा हास्यास्पद दावा !

जनतेने काँग्रेसलाच संपवण्याच्या स्थितीत आणल्यामुळे गेल्या ९ वर्षांत भारताची भरभराट होत आहे. काँग्रेस पूर्णपणे संपली की, देशाची प्रचंड भरभराटच होईल !

राहुल गांधी यांनी अधिक दायित्वाने बोलावे ! – रा.स्व. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे

राहुल गांधी यांच्या लंडन येथील विधानांविषयी काही बोलण्याची आवश्यकता नाही. मी त्यांना इतकेच सांगीन की, राहुल गांधी यांनी अधिक दायित्वाने बोलले पाहिजे. वास्तव काय आहे ?, हेही त्यांनी पाहिले पाहिजे.

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या परिसरातून मशीद हटवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश !

अलाहाबाद उच्च न्यायालयाने न्यायालय परिसरात असलेली मशीद वर्ष २०१७ मध्ये हटवण्याचा आदेश दिला होता. हा आदेश सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरवत मशीद हटवण्याची आणि त्यास पर्यायी भूमी देण्यासाठी राज्यशासनाकडे मागणी करण्याची अनुमती वक्फ बोर्डाला दिली आहे.