|
ढाका (बांगलादेश) – येथे पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात १९ जुलै या दिवशी सहस्रोंच्या संख्येने लोकांनी १३ किलोमीटर दूर पर्यंत मोर्चा काढला. विरोधी पक्षांच्या या मोर्च्याद्वारे पंतप्रधान शेख हसीना यांचे त्यागपत्र मागण्यात आले. ढाका शहरासमवेत देशातील अन्य १६ ठिकाणीही मोर्चे काढण्यात आले.
शेख हसीना के खिलाफ सड़क पर उतरे हजारों लोग: 13 किलोमीटर लंबा मार्च निकाला, बांग्लादेश PM से इस्तीफा मांगा#Bangladesh #SheikhHaseena https://t.co/TIhXswC2GM pic.twitter.com/7Bn9rcShec
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) July 19, 2023
या वेळी झालेल्या हिंसाचारात एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला, तर शेकडो लोक घायाळ झाले. बांगलादेशचा प्रमुख विरोधी पक्ष ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ या पक्षाने या मोर्च्यांचे आयोजन केले होते. विरोधी पक्षांकडून सत्ताधारी पार्टी ‘बांगलादेश आवामी लीग’वर भ्रष्टाचार आणि मानवाधिकाराचे हनन केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. त्यांनी संसद विसर्जित करून अंतरिम सरकार स्थापन करण्याची मागणी केली आहे.