‘जय श्रीराम’ अशी अक्षरे असलेली भगवी पट्टी गळ्यात घालणार्‍या विद्यार्थ्यास शिक्षकाने वर्गाबाहेर काढले !

  • निधर्मी शिक्षण पद्धतीचे फलित !

  • त्याच वर्गातील मुसलमान विद्यार्थिनींना मात्र हिजाब काढायला सांगण्यास शिक्षकाचा नकार !

  • विद्यार्थी आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या आंदोलनानंतर संबंधित शिक्षकाकडून क्षमायाचना !

कोल्हापूर – शहरातील एका महाविद्यालयातील वाणिज्य शाखेच्या पहिल्या वर्गात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्याने ‘जय श्रीराम’ लिहिलेली भगवी पट्टी गळ्यात घातली होती. वर्ग चालू झाल्यावर एका शिक्षकाने त्याला गळ्यातील पट्टी काढण्यास सांगितली. यावर त्या विद्यार्थ्याने ‘वर्गातील विद्यार्थिंनींनी घातलेला हिजाब काढण्यास सांगा’, तरच पट्टी काढतो’, असे सांगितले. यावर तो शिक्षक आणि विद्यार्थी यांमध्ये वाद झाल्याने शिक्षकाने संबंधित विद्यार्थ्याला वर्गाबाहेर जाण्यास सांगितले. यानंतर महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी एकत्र आले आणि ठिय्या आंदोलन केले. ही घटना हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांना समजल्यावर त्यांनी महाविद्यालयात येऊन जाब विचारल्यावर संबंधित शिक्षकाने क्षमायाचना केली.

ही घटना १७ जुलै या दिवशी घडली. याचा ‘व्हिडिओ’ सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला आहे. ज्या विद्यार्थ्याने ही भगवी पट्टी घातली आणि संबंधित शिक्षकास बाणेदार उत्तर दिले, त्याचे हिंदु बांधवांकडून अभिनंदन केले जात आहे.

संपादकीय भूमिका 

निधर्मी शिक्षण पद्धतीमुळे हिंदुबहुल देशात ‘जय श्रीराम’ला शिक्षकांकडून विरोध केला जातो, तर त्याच वर्गातील ‘हिजाब’ घातलेल्या मुसलमान विद्यार्थिनींना  मोकळीक दिली जाते ! अशा शिक्षकावर शाळा प्रशासनाकडून कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे !