चंद्रपूर येथे पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्या बैठकीला उलगुलान संघटना आणि आंबेडकरवादी संघटना यांचा विरोध !

उलगुलान संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक !

चंद्रपूर – येथील अग्रसेन भवन परिसरात २३ जुलै या दिवशी पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्या नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते; मात्र भिडेगुरुजी यांचा चंद्रपूर जिल्हाप्रवेश आणि बैठक यांना उलगुलान संघटना आणि आंबेडकरवादी संघटना यांनी तीव्र विरोध केला. हिंदवी स्वराज्य सुवर्ण सिंहासन आणि खडा पहारा या संदर्भात असलेली पू. भिडेगुरुजी यांची ही नियोजन बैठक उधळून लावण्याची चेतावणी देत शेकडो विरोधकांनी बैठकस्थळी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांचा हा प्रयत्न सजग धारकर्‍यांसह पोलिसांनी हाणून पाडला. पोलिसांनी घोषणा देणार्‍या उलगुलान संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक केली. भिडे गुरुजींची नियोजन बैठक मात्र पूर्व नियोजित वेळेनुसार चालू झाली.

सौजन्य साम टीव्ही