धार्मिक भावनांचे दुटप्पी राजकारण आणि त्याचे परिणाम !

एरव्ही हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यात आल्यावर हिंदूंकडून संबंधितांवर कारवाई करण्याची न्याय्य मागणी झाली, तर ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्य’ या गोंडस नावाखाली हिंदूंनाच उपदेशाचे डोस पाजले जातात; परंतु सध्या ‘सर तन से जुदा’ (शिर धडापासून वेगळे करणे) या हिंदुविघातक मोहिमेच्या विरोधात पुरो(अधो)गामी टोळीतील एकही महाभाग चकार शब्दही काढायला सिद्ध नाही. नेमक्या याच हिंदुद्रोही दुटप्पीपणावर प्रकाश टाकणारा हा लेख आमच्या वाचकांसाठी साभार प्रसिद्ध करत आहोत.

म. गांधी यांच्या प्रतिमेच्या विटंबनेच्या प्रकरणी काँग्रेसच्याच ४ कार्यकर्त्यांना अटक !

स्वतःच्या कार्यकर्त्यांवर गांधी यांच्या अहिंसावादी विचारांचा संस्कार करू न शकणारी काँग्रेस म्हणे देशाला आणि जगाला अहिंसा शिकवण्याचा प्रयत्न करते !

न्यूयॉर्कमध्ये हिंदु मंदिराच्या आवारातील म. गांधी यांच्या पुतळ्याची तोडफोड

साऊथ रिचमंड हिल येथील क्वीन्स काऊंटीमधील श्री तुलसी मंदिर परिसरात १८ ऑगस्टच्या मध्यरात्री म. गांधी यांच्या पुतळ्याची अज्ञातांनी तोडफोड केली.

केंद्र सरकारशी संलग्न संस्थेने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रकाशित केलेल्या मासिकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे १३, तर म. गांधी यांचे ३ लेख !

इंदिरा गांधी पंतप्रधान असतांना त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर एक टपाल तिकीट काढले होते, हे काँग्रेस कशी काय विसरते ?

कॅनडामध्ये म. गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना

कॅनडामध्ये रिचमंड हिल येथील श्री विष्णु मंदिराबाहेर असलेल्या  म. गांधी यांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केली. या घटनेचा स्थानिक हिंदूंनी निषेध केला असून पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.

म. गांधी यांनीच सुभाषचंद्र बोस यांची हत्या केली ! – भाजपचे राजस्थानमधील खासदार खिचर

गांधी यांनी सुभाषचंद्र बोस यांना निवडणूक लढवण्यासाठी सिद्ध तर केले; पण त्यांना मारलेही, असे वक्तव्य राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील भाजपचे खासदार नरेंद्र कुमार खिचर यांनी केले.

मंदिरे तोडून बांधलेल्या मशिदी गुलामीची चिन्हे आहेत ! – म. गांधी

गांधीजींचे हे विचार वाचून देशभरातील जी मंदिरे परकीय आक्रमकांनी पाडून मशिदी उभारल्या, त्या परत देण्याविषयी सांगण्याचे धाडस काँग्रेसवाले अन् संबंधित करतील का ?

वलसाड (गुजरात) येथे ‘माझा आदर्श नथुराम गोडसे’ याविषयावर वक्तृत्व स्पर्धा  

सरकारी आणि खासगी शाळांमधील ५ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी कुसुम विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये ‘मारो आदर्श नथुराम गोडसे’ असा विषय होता. यामध्ये पंडित नथुराम गोडसे यांना आदर्श म्हणणार्‍या मुलाला पहिले पारितोषिक देण्यात आले.

बिहारमध्ये मोहनदास गांधी यांच्या पुतळ्याची तोडफोड

येथील चरखा पार्कमधील मोहनदास गांधी यांच्या पुतळ्याची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली.

न्यूयॉर्क येथे मोहनदास गांधी यांच्या पुतळ्याची अज्ञातांकडून तोडफोड

भारतात असहिष्णुता वाढत असल्याचे सांगणार्‍या अमेरिकेने तेथील समाजात गांधीविरोध का वाढत आहे, याची माहिती प्रथम जगाला द्यावी !