मुंबई – मोहनदास करमचंद गांधी यांच्या हत्येवर ‘बुलेट’ नावाचा एक चित्रपट लवकरच येणार आहे. म. गांधी यांच्यावर ३ गोळ्या झाडण्यात आल्याचे म्हटले जाते. प्रत्यक्षात त्यांच्यावर ४ गोळ्या झाडण्यात आल्या. ही चौथी गोळी पंडित नथुराम गोडसे यांच्या बंदुकीतून सुटलीच नव्हती. त्यामुळे ती गोळी कुणी झाडली, याचा या चित्रपटातून खुलासा करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटाचे निर्माता आणि दिग्दर्शक सचिन मोहिते आहेत.
‘बुलेट’ चित्रपटाचा टिझर (चित्रपटाचा अत्यंत संक्षिप्त भाग) प्रसिद्ध करण्यात आला आहे. यावर अनेकांनी सामाजिक माध्यमांतून प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात अनिकेत अहुजा यांनी म्हटले, ‘प्रत्येकाचे सत्य नक्की समोर येईल; कारण सत्य कधीच लपवता येत नाही.’ ‘अर्जुन सिंग म्हणाले, हा विषय ‘काश्मीर फाईल्स’पेक्षा अधिक धक्कादायक असेल. हा चित्रपट बाहेर आल्यावर गोडसे यांना शेवटी न्याय मिळेल.