म. गांधी यांच्या प्रतिमेच्या विटंबनेच्या प्रकरणी काँग्रेसच्याच ४ कार्यकर्त्यांना अटक !

राहुल गांधी यांच्या केरळमधील कार्यालयातील प्रकरण

म. गांधी यांच्या प्रतिमेची विटंबना

वायनाड (केरळ) – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या वायनाड मतदारसंघातील कार्यालयात २ मासांपूर्वी म. गांधी यांच्या प्रतिमेची विटंबना केल्याच्या प्रकरणी केरळमधील काँग्रेसच्याच ४ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यामध्ये राहुल गांधी यांच्या कार्यालयातील दोघा कर्मचार्‍यांचा समावेश आहे. प्रतिमेची विटंबना झाल्यानंतर ‘हे कृत्य स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या कार्यकत्यांनी केले आहे’, असा आरोप राहुल गांधी यांच्या कार्यालयाच्या वतीने करण्यात आला होता. (अशा खोटारड्या काँग्रेसने देशावर ६० वर्षांहून अधिक काळ कशा प्रकारे राज्य केले असेल, हे लक्षात येते ! अशी काँग्रेस आता राजकीयदृष्ट्या इतिहासजमाच होणे आवश्यक ! – संपादक)

संपादकीय भूमिका

ढोंगी अहिंसावादी काँग्रेसची खरी मानसिकता ! स्वतःच्या कार्यकर्त्यांवर गांधी यांच्या अहिंसावादी विचारांचा संस्कार करू न शकणारी काँग्रेस म्हणे देशाला आणि जगाला अहिंसा शिकवण्याचा प्रयत्न करते !