म. गांधी यांनीच सुभाषचंद्र बोस यांची हत्या केली ! – भाजपचे राजस्थानमधील खासदार खिचर

गांधी यांनी सुभाषचंद्र बोस यांना निवडणूक लढवण्यासाठी सिद्ध तर केले; पण त्यांना मारलेही, असे वक्तव्य राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील भाजपचे खासदार नरेंद्र कुमार खिचर यांनी केले.

मंदिरे तोडून बांधलेल्या मशिदी गुलामीची चिन्हे आहेत ! – म. गांधी

गांधीजींचे हे विचार वाचून देशभरातील जी मंदिरे परकीय आक्रमकांनी पाडून मशिदी उभारल्या, त्या परत देण्याविषयी सांगण्याचे धाडस काँग्रेसवाले अन् संबंधित करतील का ?

वलसाड (गुजरात) येथे ‘माझा आदर्श नथुराम गोडसे’ याविषयावर वक्तृत्व स्पर्धा  

सरकारी आणि खासगी शाळांमधील ५ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी कुसुम विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये ‘मारो आदर्श नथुराम गोडसे’ असा विषय होता. यामध्ये पंडित नथुराम गोडसे यांना आदर्श म्हणणार्‍या मुलाला पहिले पारितोषिक देण्यात आले.

बिहारमध्ये मोहनदास गांधी यांच्या पुतळ्याची तोडफोड

येथील चरखा पार्कमधील मोहनदास गांधी यांच्या पुतळ्याची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली.

न्यूयॉर्क येथे मोहनदास गांधी यांच्या पुतळ्याची अज्ञातांकडून तोडफोड

भारतात असहिष्णुता वाढत असल्याचे सांगणार्‍या अमेरिकेने तेथील समाजात गांधीविरोध का वाढत आहे, याची माहिती प्रथम जगाला द्यावी !

‘पद्मावत’ आणि ‘जोधा अकबर’ या चित्रपटांना अभिव्यक्तीस्वातंत्र्य अन् ‘नथुराम गोडसे’ यांच्या चित्रपटाला विरोध, हा गांधींचा विश्वासघात !

‘व्हाय आय् किल्ड गांधी ?’ या चित्रपटाला काँग्रेस, गांधीवादी आणि काही पुरोगामी मंडळी यांच्याकडून विरोध केला जात आहे. या विरोधातील ढोंगीपणा उघड केला आहे.

पुन्हा नथुराम !

‘पंडित नथुराम गोडसे यांनी ‘गांधी यांना ३ गोळ्या मारल्या होत्या’, असे जबानीत सांगितले होते; मात्र प्रत्यक्षात गांधी यांच्या शरिरातून ४ गोळ्या बाहेर काढण्यात आल्या. तर मग चौथी गोळी त्यांना कुणी मारली ?  हे त्या वेळी का शोधण्यात आले नाही ?

सर्वोच्च न्यायालयाचा ‘व्हाय आय किल्ड गांधी’ (मी गांधी यांना का मारले) चित्रपटाविरोधातील याचिकेवर सुनावणीस नकार

न्यायालयाने म्हटले आहे की, कलम ३२ अंतर्गत याचिका तेव्हाच प्रविष्ट केली जाऊ शकते, जेव्हा मूलभूत अधिकाराच्या उल्लंघनाचा प्रश्न असेल.

‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटाला काँग्रेसचा विरोध, चित्रपटावर बंदी घालण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

इतर वेळी अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे गुणगान करणारे काँग्रेसवाले या चित्रपटावर मात्र बंदी घालण्याची भाषा करतात ? ही अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी नव्हे का ?

बापूंकडून बाबूंकडे !

युवकांना संभ्रमित करणारे देशाच्या मानगुटीवर बसलेले गांधीवादाचे भूत बाजूला करून देशातील क्षात्रवृत्तीचा गौरव करायला हवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जर हे कार्य करणार असतील, तर समस्त भारतियांनी त्यांच्या या भूमिकेचे स्वागत करायला हवे !