गडचिरोली येथे विषारी दारू प्यायल्याने दोघांचा मृत्यू, तर ५० हून अधिक जणांना बाधा

दारूबंदी असलेल्या भागांत अशा प्रकारच्या घटना होणे हे कायद्याच्या पालनासाठी ज्यांनी जागरूक रहाणे प्रशासनाला जमत नसल्याचेच द्योतक आहे !

‘तांडव’च्या विरोधात कारवाई केली जाईल ! – अनिल देशमुख, गृहमंत्री, महाराष्ट्र

देवतांचे विडंबन असलेल्या ‘तांडव’ या वेब सिरीजविषयी तक्रार आली असून करवाई होईल; पण ‘ओटीटी’वर कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नाही. त्यामुळे केंद्र सरकारने याविषयी कायदा आणावा, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारच्या विरोधात अण्णा हजारे यांचे ३० जानेवारीपासून शेवटचे उपोषण

आजही शेतकर्‍यांना दूध, भाजीपाला, फळे रस्त्यावर फेकून द्यावी लागतात. हे सहन होत नाही आणि वाईट वाटते- अण्णा हजारे

रेडी गावात रोजगार निर्मितीच्या मागणीसाठी २६ जानेवारीपासून उपोषण करण्याची ग्रामस्थांची चेतावणी

प्रशासन ग्रामस्थांचे रोजगाराचे प्रश्‍न सोडवत नाही; म्हणून स्थानिकांना अशा मागण्या कराव्या लागतात !

असलदे येथील रस्त्याचे काम होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देवगड येथील कार्यालयास टाळे ठोकण्याची चेतावणी

जनतेने आंदोलन केल्यावरच काम करायचे, अशी प्रशासनाची नवीन कार्यपद्धत रूढ झाली आहे का ? असा प्रश्‍न जनतेला पडल्यास चूक ते काय ?

मिरज तालुका बजरंग दलाच्या वतीने महाराणा प्रताप यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन !

बजरंग दलाच्या वतीने महाराणा प्रताप यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मार्केटमधील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

काँग्रेसच्या काळात म्हणजे १९८० च्या दशकापासून चीनचे भारतीय भूमीवर नियंत्रण !

काँग्रेसच्या काळात झालेल्या चुका भाजपच्या राज्यात सुधारणे आवश्यक आहेत, हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !

सिंधुदुर्ग जिल्हा नगररचना कार्यालयातील भ्रष्टाचाराच्या विरोधात २६ जानेवारीला आंदोलन करण्याची चेतावणी

सिंधुदुर्ग जिल्हा नगररचना विभागात वरिष्ठ अधिकार्‍यांच्या सहकार्यानेच भ्रष्टाचार होत आहे. या भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे अशी चेतावणी येथील सामाजिक कार्यकर्ते डी.के. सावंत यांनी प्रशासनाला दिली आहे.

धनंजय मुंडें यांच्या विरोधात भाजप महिला मोर्चाचे आंदोलन

धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाची आणि जनतेची फसवणूक केल्यानी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप महिला कार्यकर्त्यांनी केली.

तिरुनेलवेली (तमिळनाडू) येथील मंदिराच्या भूमीवर अवैधरित्या बांधलेली ख्रिस्ती दफनभूमी हालवण्यात येणार !

हिंदूंच्या विरोधाचा परिणाम ! प्रत्येक न्यायहक्कांसाठी हिंदूंनी आवाज उठवल्यावर प्रशासन आणि राज्य सरकारे यांना जाग येते, असाच आतापर्यंतचा अनुभव आहे. हे थांबण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !