बलात्काराच्या प्रकरणी जन्मठेपेच्या शिक्षेतील २० वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर आरोपीची निर्दोष मुक्तता

कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून रहित !

असे आहे, तर त्या आरोपीने भोगलेल्या मनस्तापाचे काय ? तसेच निर्दोष असूनही २० वर्षे कारागृहात रहावे लागणे, हा घोर अन्याय नव्हे का ? ‘यास उत्तरदायींनाही कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे’, असे जनतेला वाटल्यास चूक ते काय ?


आगरा (उत्तरप्रदेश) – बलात्काराच्या प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने २० वर्षांपासून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या विष्णु तिवारी या व्यक्तीला अलाहाबाद उच्च न्यायालयाने  निर्दोष घोषित केले आहे. या काळात त्यांच्या कुटुंबातील सर्वच जणांचा मृत्यू झाला आहे.

आगरा मध्यवर्ती कारागृहाचे वरिष्ठ अधीक्षक व्ही.के. सिंह म्हणाले की, विष्णु याला लवकरच सोडण्यात येईल. जो गुन्हा केलाच नाही, त्यासाठी त्याला २ दशके कारागृहात रहावे लागले, हे दुर्दैव आहे.