हज हाऊसच्या बांधकामाला कायमस्वरूपी स्थगिती द्या ! – समस्त हिंदू आघाडी

हज हाऊसमध्ये देशद्रोही कारवाया होत असल्याचे यापूर्वी सिद्ध झालेले असतांना नवीन हज हाऊसच्या निर्मितीसाठी जागा देणे म्हणजे देशातील आतंकवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासारखेच नाही का ? असे असतांना अशी मागणी का करावी लागते ?

बेळगावमधील १६ मंदिरांवर प्रशासक नियुक्त करण्याच्या निर्णयाच्या विरोधात श्रीराम सेना हिंदुस्थानची निदर्शने

बेळगाव शहरासह जिल्ह्यातील १६ मंदिरांवर प्रशासक नियुक्त करण्याच्या या निर्णया विरोधात श्रीराम सेना हिंदुस्थान संघटनेच्या वतीने बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निदर्शने करण्यात आली आणि जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

बलात्काराचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यावर अल्पवयीन मुलाकडून मुलीची हत्या !

पॉर्न चित्रपटांवर बंदी घातली असतांनाही ते अद्यापही पहाता येत असतील, तर सरकारची बंदी फोल ठरली आहे

गुंटूर (आंधप्रदेश) येथे सीतामातेच्या पदचिन्हांच्या ठिकाणी ख्रिस्त्यांकडून विशाल क्रॉसची उभारणी !

आंध्रप्रदेशमध्ये ख्रिस्ती मुख्यमंत्री वाय. जगनमोहन रेड्डी यांचे सरकार आल्यापासून हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड केली जात आहे आणि आता थेट तेथे क्रॉस उभारण्यात येत आहे, तरीही आंध्रप्रदेशातील आणि देशातील हिंदू शांत आहेत, हे हिंदूंना लज्जास्पद !

लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीनंतर कर्नाटकच्या जलसंपदामंत्र्यांकडून त्यागपत्र

सर्वपक्षांचे नेते एकाच माळेचे मणी आहेत, अशांची निष्पक्षपणे चौकशी होईल का ?

कर्नाटकच्या भाजप सरकारच्या कृषीमंत्र्यांनी घरातच सपत्नीक घेतली कोरोनाची लस !

टीका झाल्यानंतरही केले चुकीचे समर्थन ! सरकारी नियमांचे उल्लंघन करणार्‍या अशा मंत्र्यांवर भाजपने कारवाई करावी, अशीच जनतेची अपेक्षा आहे !  

पोलीस ठाण्याच्या हद्दीत हुक्का पार्लर आणि डान्स बार आढळल्यास पोलीस अधिकार्‍यांना उत्तरदायी धरणार ! – अनिल देशमुख, गृहमंत्री

हुक्का पार्लर प्रकरणी शिवसेनेने तारांकित प्रश्‍नोत्तराच्या वेळी ‘या प्रकरणी किती ठिकाणी कारवाई करण्यात आली ?’ असा प्रश्‍न उपस्थित केला होता.

पुणे येथील कोट्यवधी रुपये व्यय करून बांधलेल्या तळई उद्यानाची दुर्दशा !

सिंहगडावर येणार्‍या पर्यटकांना विरंगुळा म्हणून वन विभागाने अनुमाने १ कोटी रुपये व्यय करून बांधलेले तळई उद्यान गेल्या ६ वर्षांपासून धूळ खात पडून आहे.

राज्यातील ९० टक्के वाळू उत्खनन अवैध, जिल्हाधिकार्‍यांपासून मंत्रालयापर्यंत हप्ते चालू ! – प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

गेली अनेक वर्षे अवैध वाळूउपसा होत आहे. यात अनेक वेळा तहसीलदार, माहिती अधिकार कार्यकर्ते आदींवर प्राणघातक आक्रमणे झाली आहेत. अवैध वाळूउपसा चालू रहाण्यामागे भ्रष्टाचार हेच मोठे कारण आहे, हे सामान्य जनतेलाही माहीत आहे.

गाय आणि अन्य जनवरे यांच्या हत्या रोखण्यासाठी नियमांची कार्यवाही करा ! – कोलकाता उच्च न्यायालयाचा कोलकाता महापालिकेला आदेश

असा आदेश का द्यावा लागतो ? पालिकेला तिचे दायित्व ठाऊक नाही का ?