मंत्री संजय राठोड यांना तात्काळ अटक करा ! – भाजपा महिला मोर्चाची तीव्र निदर्शने

बिनखांबी गणेश मंदिर परिसरात घोषणाबाजी करतांना गायत्री राऊत आणि अन्य महिला कार्यकर्त्या

कोल्हापूर – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मंत्री संजय राठोड यांना तात्काळ अटक करावी आणि मंत्रीपदाचे त्यागपत्र द्यावे, या मागणीसाठी भाजप महिला मोर्चाच्या  अध्यक्षा गायत्री राऊत यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करून रस्ता बंद आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी शरद पवार जागे व्हा, पूजाला न्याय द्या, सोनिया गांधी जागे व्हा पूजाला न्याय द्या, अनिल देशमुख जागे व्हा-खुनाचा गुन्हा नोंद करा, अशा मागण्यांचे फलक घेऊन महिला मोर्चा पदाधिकारी यांनी बिनखांबी गणेश मंदिर परिसरात जोरदार घोषणाबाजी केली.

या प्रसंगी प्रमोदिनी हर्डीकर, आसावरी जुगदार, स्वाती कदम, सुनीता सूर्यवंशी, गौरी जाधव, दीपा ठाणेकर, कार्तिकी सातपुते, संगीता चव्हाण, सीमा बारामते, वंदना नायकवडी, शुभांगी चितारे, शुष्मा गर्दे, मयुरी, विजयमाला जाधव, मयुरी पाटील, जयश्री दबडे, नीलम जाधव इत्यादी महिला उपस्थित होत्या.