कानपूर येथे मशिदींवरील अवैध भोंग्यांच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे स्वाक्षरी अभियान !

उत्तरप्रदेशमध्ये हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रनिष्ठ योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रीपदावर आरूढ असतांना असे अभियान राबवण्याची राष्ट्रप्रेमींवर वेळ येणे अपेक्षित नाही ! सरकारनेच आता पुढाकार घेऊन अवैध भोंग्यांवर कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे !

कानपूर (उत्तरप्रदेश) – येथे बजरंग दलाच्या नेतृत्वाखाली हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी मशिदींवरील अवैध भोंग्यांच्या विरोधात स्वाक्षरी अभियान प्रारंभ केले आहे. यातून १ लाख स्वाक्षर्‍या गोळा करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. या स्वाक्षर्‍यांसमवेत भारताच्या राष्ट्रपतींना निवेदन सादर केले जाणार आहे.

(अशा प्रकारांमध्ये राष्ट्रपती नव्हे, तर राज्य सरकारला अधिकार असल्याने या अभियानाची योग्य फलनिष्पत्ती मिळण्यासाठी राष्ट्रप्रेमींनी राज्य सरकारकडे याविषयी मागणी लावून धरणे अपेक्षित आहे ! – संपादक)