बुलढाणा येथे असदुद्दीन ओवैसी यांच्या भाषणाच्या वेळी औरंगजेबाच्या नावाच्या घोषणा !
ओवैसी यांच्या भाषणाच्या वेळी औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. ‘जबतक सूरज चाँद रहेगा, औरंगजेब तेरे नाम रहेगा ।’ अशा घोषणा कार्यकर्ते देत होते.
ओवैसी यांच्या भाषणाच्या वेळी औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. ‘जबतक सूरज चाँद रहेगा, औरंगजेब तेरे नाम रहेगा ।’ अशा घोषणा कार्यकर्ते देत होते.
तुम्हाला बोलण्यापासून कुणी अडवले ?, कुणी निंदा कुणी वंदा कालीकीर्तनचा आमचा धंदा, सत्य सांगण्याचा आमचा धंदा आहे आणि आम्ही बोलत राहू. ‘भो-भो’ करण्याची काहींना सवय असते; मात्र आम्ही आमचे काम करत राहू.
भाजपला मुसलमानद्वेषी म्हणणार्या काँग्रेसला आता याविषयी काय म्हणायचे आहे ?
आता तरी पोलिसांना धर्मांधांचे खरे स्वरूप लक्षात येऊन ते त्यांच्यावर कारवाई करतील का ?
औरंगजेबाचे उघडपणे होत असलेले उदात्तीकरण न दिसणारे पोलीस आंधळे आणि बहिरे आहेत का ? अशा कर्तव्यचुकार पोलिसांवरही तात्काळ कठोर कारवाई केली पाहिजे !
छत्रपती संभाजीनगर येथील ‘एम्.आय.एम्’च्या उपोषणात औरंगजेबाचे फलक, तसेच आक्षेपार्ह वक्तव्यांद्वारे उदात्तीकरण !
‘दुष्टांना दाखवलेला मानवतावाद हा नेहमी सज्जनांच्या जिवावर उठतो’, हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे धर्मांध आणि त्यांचे हितसंबंधी यांना मानवता दाखवण्याऐवजी ते ज्यांना पीडित करतात, त्यांना दाखवणे योग्य नाही का ?
छत्रपती संभाजी महाराज यांना हालहाल करून ठार मारणारा आणि लक्षावधी हिंदूंची क्रूर हत्या अन् सहस्रों मंदिरांचा विध्वंस करणारा औरंगजेब इम्तियाज जलील यांना किती ‘प्रिय’ आहे, हे या उपोषणावरून लक्षात येते.
‘एम्.आय.एम्.’ (मजलीस-ए-इत्तेहादुल-मुस्लमीन) या पक्षाकडून नवी मुंबईमध्ये २५ फेब्रुवारी, तर मुंबईमध्ये २६ फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय अधिवेशन घेण्यात येणार आहे, अशी माहिती या खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.
देशातील संत, संन्यासी आणि सर्वसामान्य हिंदू जनता सारेच ‘हे (भारत) हिंदु राष्ट्र आहे’, असे सातत्याने म्हणत आहेत. ‘हिंदुस्थान हिंदु राष्ट्र म्हणून घोषित करावा’, अशी मागणी सुद्धा आता जोर धरू लागली आहे.