|
अलीगड (उत्तरप्रदेश) – नुकतीच हरिद्वार येथे धर्मसंसद झाली होती. त्यात एका विशेष धर्माला तोडण्याचे आवाहन करण्यात आले. हा धर्म कोणता होता ? हा मुसलमान धर्म होता. हिंदुत्वाची शाल पांघरून काही आतंकवादी मुसलमानांना तोडण्याची भाषा करत होते. आमच्या इस्लाममध्ये स्वतःला आणि दुसर्याला मारण्याची अनुमती नाही; मात्र जेव्हा आक्रमणकारी अत्याचाराची परिसीमा गाठतो, तेव्हा त्याला मारण्याची अनुमती आहे. जर दलित आणि मुसलमान एकत्र आले, तर ते संपूर्ण भारतात राज्य करू शकतात, असे विधान एम्.आय.एम्.चे अलीगडचे जिल्हाध्यक्ष गुफरान नूर यांनी जमालपूर येथे केले. ते येथे एका कोपरा सभेमध्ये बोलत होते.
AIMIM leader triggers row ahead of UP election; wants ruler like Mughal emperor Babur https://t.co/dgWVWIcHGE
— Republic (@republic) January 8, 2022
गुफरान नूर पुढे म्हणाले की, बाबर चुकीचा नव्हता. ज्याप्रमाणे आताची स्थिती आहे, अशा वेळी बाबरसारखेच शासन हवे. अल्लाच्या कृपेने तो दिवस लवकरच येईल आणि बाबरसारखे राज्य असेल. (हिंदूंनी हिंदु राष्ट्राचा उद्घोष केल्यावर आकाश-पाताळ एक करणारे नूर यांच्या या विधानाविषयी गप्प का ? – संपादक) एक किंवा दोन मुले जरी जन्माला घातली, तरी त्यांचे पालनपोषण अल्लाच करतो. (गुंडगिरी, तस्करी, चोरी, दरोडेखोरी आदी करून कुणी स्वतःचे पालनपोषण करत असेल, तर त्याला काय म्हणायचे ? – संपादक)
(म्हणे) ‘मुसलमानांनी अधिक मुलांना जन्म दिला नाही, तर भारतावर राज्य कसे करणार ?’
गुफरान नूर यांनी डिसेंबर २०२१ मध्ये ‘मुसलमानांनी अधिक मुलांना जन्म दिला नाही, तर आपला समाज भारतावर राज्य कसा करणार ? असदुद्दीन ओवैसीसाहेब (एम्.आय.एम्.चे अध्यक्ष) पंतप्रधान कसे होणार ? शौकत अलीसाहेब (एम्.आय.एम्.चे नेते) उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री कसे होणार ?’, असे प्रश्न एका चर्चेमध्ये विचारत असल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला होता. (नूर यांनी गेल्या मासात अशी विधाने केली होती. त्यावरून त्यांची मानसिकता स्पष्ट झाली होती. आता त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना धार्मिक द्वेष पसरवल्यावरून कारागृहात टाकणेच योग्य ! – संपादक)