संभाजीनगर – ‘मुसलमानांच्या आरक्षणाचे सूत्र महत्त्वाचे आहे. विषमता संपली पाहिजे. मुसलमानांना शिक्षणात ४ टक्के आरक्षण द्यायला हवे, असे मुंबई उच्च न्यायालयाने सांगितले आहे. मुसलमानांना आरक्षण न देणे हा अन्याय आहे. मुसलमानांची सामाजिक आणि आर्थिक दुर्बलता न्यायालयाने मान्य केली आहे, तर अडचण काय आहे ? आरक्षणासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला. आता आम्हीही (मुसलमानांनी) रस्त्यावर उतरावे का ? तुम्हालाही तेच हवे आहे का ?’, असा प्रश्न एम्.आय.एम्.चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी १८ नोव्हेंबर या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
मुस्लिम आरक्षणासाठी समाजानं रस्त्यावर उतरावं का? औरंगाबादमध्ये ओवेसींचे सरकारला 5 सवालhttps://t.co/YMLNs0qgLP#asaduddinowaisi | #mim | #aurangabad | #muslimreservation
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 18, 2021
आम्ही जाब विचारला, तर आम्हाला जातीयवादी ठरवता. तुम्ही अन्याय करता त्याचे काय ? राज्यातील मुस्लिमांना आरक्षण दिले पाहिजे. सर्वच मुस्लिमांना देऊ नका; पण मुस्लिमांमधील १५ जातींना न्यायालयाने आरक्षण द्यायला सांगितले आहे. त्यांना तर आरक्षण द्या, असेही ते म्हणाले.