
मुंबई – विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम तात्काळ चालू करा, असे आदेश राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. विशाळगडावर १५७ अतिक्रमणे असून ९० अतिक्रमणे प्रशासनाने तोडली आहेत; मात्र उर्वरित अतिक्रमण काढण्यास प्रशासन दिरंगाई करत आहे, असे निवेदन माजी आमदार नितीन शिंदे आणि सौ. स्वाती शिंदे यांनी मुंबई येथे भेटून महसूलमंत्र्यांना दिले. त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे आदेश दिले. यावर कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ‘हे अतिक्रमण शासन १ मासात हटवेल’, असे महसूलमंत्र्यांना दूरभाषवर सांगितले.