हुपरी (जिल्हा कोल्हापूर) येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी अनुमती द्या ! – हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे निवेदन

हुपरीचे मुख्याधिकारी अजय नरळे (मध्यभागी) यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

हुपरी (जिल्हा कोल्हापूर) – छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास पुढील पिढीला ज्ञात होण्यासाठी, तसेच परिसरातील युवा पिढीसमोर प्रेरणास्थान निर्माण होण्यासाठी हुपरी येथील गट क्रमांक ८४४ /अ/१ मध्ये सूर्यतलाव येथे छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यास अनुमती देण्यात यावी, या मागणीचे निवेदन हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने मुख्याधिकारी अजय नरळे यांना देण्यात आले. या वेळी हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. नितीन काकडे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. अजित सुतार आणि श्री. शिवाजी शिनगारे, छत्रपती ग्रुपचे सर्वश्री सौरभ खोत, संदीप मुधाळे, उमाजी लाड, शुभम चोपडे, अभिनंदन माणकापुरे, बजरंग दलाचे श्री. गौरव नेमिष्टे आणि श्री. श्रावण मुधाळे, श्री. सचिन भोसले, श्री. ऋषिकेश दिवाण यांसह अन्य उपस्थित होते.