चुकीच्या उत्तरपत्रिका पडताळणारे परीक्षक मोकळे !

उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करतांना होणार्‍या चुकांचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. असे असतांनाही मूल्यांकनात चुका करणार्‍या परीक्षकांवर मुंबई विद्यापिठाने अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

वादग्रस्त ‘ट्वीट’प्रकरणी संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्या सक्तीच्या रजेवर

‘ट्विटर’वर वादग्रस्त ‘ट्वीट’ केल्याच्या प्रकरणी संरक्षण मंत्रालयातील प्रवक्त्या स्वर्णश्री राव राजशेखर यांना मंत्रालयाने तडकाफडकी सक्तीच्या रजेवर पाठवले.

‘ईडी’ने अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडिया संस्थे’सह २ लाखांहून अधिक आस्थापनांची बँक खाती गोठवली

विदेशी चलनाच्या संदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) मानवाधिकारांवर देखरेख करणारी ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडिया’ या संस्थेसह तब्बल २ लाख ९ सहस्र ३२ आस्थापनांची बँक खाती गोठवली.

मुंबई विद्यापिठाकडून ‘एल्एल्बी’च्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याला अपमानास्पद वागणूक

मुंबई विद्यापिठातील ‘एल्एल्बी’चा विद्यार्थी असलेल्या अभिनय म्हात्रे याला विद्यापिठाची चूक असूनही अपमानास्पद वागणूक मिळाली. अभिनय याला ५ सत्रांत १० ‘केटी’ लागल्या होत्या; मात्र पुनर्मूल्यांकनात चांगले गुण मिळाले.

प्रा. श्रीपाल सबनीस यांच्यासह ७ जणांना नोटीस !

प्रा. डॉ. म.सु. पगारे यांना दिलेल्या त्रासाविषयी प्रविष्ट केलेल्या फौजदारी गुन्ह्याच्या याचिकेत प्रा. श्रीपाल सबनीस यांच्यासह विद्यापीठाचे कुलसचिव, उच्च शिक्षण महासंचालक आणि शिक्षण संचालक, पुणे अशा ७ जणांना न्यायालयाने नोटीस बजावली आहे.

भोपाळ येथे रावण दहनाच्या कार्यक्रमात विदेशी तरुणींच्या नृत्याचे आयोजन !

कोलार भागातील बंजारी दसरा मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या रावणदहनाच्या कार्यक्रमाच्या वेळी विदेशी तरुणींच्या अश्‍लील नृत्याचे आयोजन करण्यात आल्याचे समोर आले आहे.

शिर्डी संस्थान विश्‍वस्त आणि कर्मचारी यांना एकूण १ कोटी रुपयांची चांदीची नाणी देणार !

‘साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवा’ची आठवण म्हणून संस्थानातील कर्मचारी, सर्व आजी विश्‍वस्त आणि प्रतिनियुक्तीवरील अधिकारी यांना साई प्रतिमा असलेली चांदीची नाणी विनामूल्य दिली जाणार आहेत; मात्र भाविकांना यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत.

रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाच्या आवारातील साधिकेचे अवैधरित्या चित्रीकरण करणार्‍या ‘इंडिया टुडे’च्या पत्रकारांच्या विरोधात फोंडा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट

रामनाथी, फोंडा, गोवा येथील सनातन संस्थेच्या प्रवेशद्वारासमोर येऊन आश्रमाच्या आवारात उभ्या असलेल्या सनातनच्या साधिकेचे अवैधरित्या चित्रीकरण केल्याच्या प्रकरणी ‘इंडिया टुडे’ वृत्तवाहिनीचे पत्रकार मयुरेश गणपत्ये आणि छायाचित्रकार महेश मोरे …..

केंद्र सरकारकडून ६४ आयुर्वेद महाविद्यालयांतील प्रवेशप्रक्रियांवर बंदी

‘भारतीय केंद्रीय चिकित्सा परिषदे’ने (‘सीसीआयएम्’ने) केलेल्या शिफारसींवरून मोदी सरकारच्या ‘आयुष’ मंत्रालयाने देशभरातील ६४ आयुर्वेद महाविद्यालयांतील चालू वर्षीची प्रवेशप्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेतला.

उत्तरपत्रिका तपासणीत निष्काळजीपणा केल्यामुळे मुंबई विद्यापिठाचे ३५ सहस्र विद्यार्थी अनुत्तीर्ण !

गेल्या वर्षीचा निकाल आल्यानंतर मुंबई विद्यापिठाच्या ९७ सहस्रांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका पुन्हा पडताळण्यासाठी अर्ज केला होता. त्यांपैकी ३५ सहस्र म्हणजेच अनुमाने ३६ टक्के विद्यार्थ्यांना विद्यापिठाने चुकून अनुत्तीर्ण केले होते. माहिती अधिकारात ही गोष्ट समोर आल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते विहार दुर्वे यांनी सांगितले.


Multi Language |Offline reading | PDF