पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानचे सरकारीकरण झाल्यानंतर वाढलेले अपप्रकार आणि गैरव्यवहार !

पंढरपूरचे श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान

पंढरपूरचे देवस्थान सरकारच्या कह्यात गेले. आय.ए.एस्. असलेल्या कार्यकारी अधिकार्‍याने मंदिरातील जळोजी-मळोजी महाराजांची समाधी कट्टा समजून पाडली. पंढरीचा प्रसाद चुरमुरे आणि बत्तासे असा असतांना ती परंपरा मोडून लाडूचा प्रसाद चालू केला. त्यात वेळोवेळी अपहार होतो. एका कार्यकारी अधिकार्‍याने स्थानांतर (बदली) झाल्यावर जातांना रुक्मिणीदेवीला आलेल्या उत्कृष्ट साड्या, मंदिराचे अन्य इलेक्ट्रॉनिक साहित्य पळवून नेले. एका अधिकार्‍याने बोधले महाराजांची गेली ३५० वर्षें चाललेली पूजा बंद केली. मंदिरात भक्तांचे राज्य पाहिजे. आता मंदिर नोकर, सुरक्षारक्षक आणि पोलीस यांनी वेढलेले आहे.

– कै. भागवताचार्य वा.ना. उत्पात, पंढरपूर, सोलापूर

(संदर्भ : मासिक ‘सांस्कृतिक वार्तापत्र’, १५ ऑगस्ट २००७)