ही सरकारची कार्यक्षमता आहे कि भ्रष्टाचार ?

‘डॉ. दाभोलकर यांच्यानंतर अंनिसच्या ट्रस्टचे काम आणि व्यवहार यांच्याविषयी माहिती घेण्याची प्रक्रिया दीड वर्ष करावी लागली. वर्ष २०१३ ते २०१८ या कालावधीत ट्रस्टची काही प्रक्रिया मार्गी लावण्यात आली. अद्यापही काही कायदेशीर प्रक्रिया चालू आहेत. सनातन संस्थेकडून करण्यात आलेल्या तक्रारींविषयी डॉ. दाभोलकर यांनी वेळोवेळी स्पष्टीकरण दिले होते; मात्र त्या वेळी ट्रस्ट आणि संघटना यांच्यात समन्वय साधणारा कोणताही दुवा नव्हता, ही एक गोष्ट ध्यानात आली. सध्या ट्रस्टमध्ये ५ – ६ कोटी रुपये जमा आहेत. हा पैसा लोकांनी विश्‍वासाने ट्रस्टकडे जमा केला आहे. आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला उत्तरदायी आहोत, विश्‍वस्तांना नाही’, असे वक्तव्य अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले आहे.’