उद्या मलाही वाटेल मुख्यमंत्री व्हावे ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका मुलाखतीत मलाही मुख्यमंत्री व्हावे, असे वाटत आहे, असे मत व्यक्त केले होते. त्यावर शरद पवार बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका मुलाखतीत मलाही मुख्यमंत्री व्हावे, असे वाटत आहे, असे मत व्यक्त केले होते. त्यावर शरद पवार बोलत होते.
गुन्हे अन्वेषण शाखेने प्रविष्ट केलेल्या या आरोपपत्रात ५०० पाने गोस्वामी आणि दासगुप्ता यांच्या ‘चॅट’चीच आहेत. या संवादातून गोस्वामी यांना पुलवामा आक्रमण आणि एअर स्ट्राईक याची पूर्वकल्पना असल्याचे पुढे येत आहे.
रास्तभाव दुकानांतील ई-पॉस उपकरणांमधील ई-केवायसी आणि मोबाईल सिडींग सुविधेचा अधिकतम वापर करून आधार आणि भ्रमणभाष क्रमांक सिडींगचे कामकाज पूर्ण करण्यात येणार आहे.
या प्रकरणी विवाहनोंदणी कार्यालयातील कर्मचार्यांनी लाच घेऊन विवाह प्रमाणपत्रे दिल्याचा आरोप महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो यांनी केला आहे.
मुंबईमध्ये मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या तिकिटांची अनधिकृत विक्री करणार्या तीन दलालांना अटक करून त्यांच्याकडून ४०० ई-तिकिटे हस्तगत करण्यात आली आहेत. हस्तगत केलेल्या तिकिटांचे एकूण मूल्य ६ लाख रुपयांहून अधिक आहे.
सध्या गोव्यात अनेक पर्यटक येत आहेत. कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर मास्क वापरण्यासंबंधीचे नियम अनेक पर्यटक आणि काही स्थानिक पाळत नसल्याने मास्क न वापरणार्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी गोव्यातील बहुतांश नागरिकांकडून होत आहे.
आणीबाणीला आणि इंदिरा गांधी यांच्या कार्यशैलीला विरोध करणाऱ्या न्यायमूर्ती कृष्णा अय्यर, शेलाट, ग्रोवर, हेगडे आणि खन्ना यांचे नाव आजही आदराने घेतले जाते !
न्यायालयाला अशी चिंता व्यक्त करावी लागते, याला पोलीस, प्रशासन आणि शेतकरी उत्तरदायी आहेत ! सामान्य लोकांकडून दंड वसूल करणारे प्रशासन आणि पोलीस येथे गांधी यांच्या माकडांप्रमाणे कृती करत आहेत, तसेच नियम भंग करणारे शेतकरीही जनताविरोधी कृती करत आहेत !
शासनाकडून बचतगटांना काम दिले जाते तसेच त्यांच्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो, असे असतांना भ्रष्टाचार करून बचतगटाच्या मूळ संकल्पनेलाच सुरूंग लावणार्यांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे !
३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्षारंभाच्या नावाखाली होणारे गैरप्रकार थांबवण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गडहिंग्लज पोलीस ठाणे आणि प्रांत कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.