महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशन २०२३
नागपूर, १४ डिसेंबर (वार्ता.) : शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि पालकांचे समुपदेशन करण्यासाठी स्थापन केलेल्या ‘सखी सावित्री समिती’च्या कार्यामध्ये महिला आमदार यांना सामावून घेऊ.
‘उपसभापती नीलम गोर्हे यांनी केलेल्या चांगल्या सूचनेची कार्यवाही करण्याच्या सूचना राज्यातील सर्व शाळांना देऊ’, असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेच्या सभागृहात दिले. आमदार श्रीमती उमा खापरे यांनी ‘सखी सावित्री समिती’ची स्थापना करण्यासंबंधीचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.