महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशन २०२३
नागपूर, १४ डिसेंबर (वार्ता.) : कायम विनाअनुदानित तत्त्वावर मान्यताप्राप्त शाळांना विहित पात्रता निकषांच्या पूर्ततेनंतर टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यात येत आहे. जून २०२३ च्या आदेशानुसार अपात्र शाळांना अनुदान देण्यासाठी निकषांची पूर्तता ३१ डिसेंबरपूर्वी पूर्ण करावी, त्यांनाही आपण अनुदान देऊ, असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेमध्ये दिली.
आमदार विक्रम काळे यांनी ‘विनाअनुदानित आणि अंशत: अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा अन् वर्ग तुकड्यांना प्रचलित अनुदान देण्याविषयीचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.