Pakistan Plans US Entry In Balochistan : पाकिस्तान अमेरिकेला बलुचिस्तानमध्ये खाणकाम भाडेपट्टीवर देणार !

सशस्त्र बलुच स्वातंत्र्यसैनिकांकडून होणारी आक्रमणे रोखण्याचा उद्देश

पाकिस्तानचे सैन्यदलप्रमुख असीम मुनीर

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानचे सैन्यदलप्रमुख असीम मुनीर यांनी बलुचिस्तानमधील खाणकाम अमेरिकेला भाडेपट्टीवर देण्याची योजना आखली आहे. यामागे सशस्त्र बलुच स्वातंत्र्यसैनिकांकडून होणारी आक्रमणे रोखणे, हा उद्देश आहे. यासह पाकिस्तानी सैन्य चीनवरील अवलंबित्व अल्प करण्याचा आणि अमेरिकेशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहे, असेही म्हटले जात आहे.

अमेरिकेच्या मध्य आशिया व्यवहार विभागाचे वरिष्ठ अधिकारी एरिक मेयर यांनी अलीकडेच इस्लामाबादमध्ये पाकिस्तानी सैन्य आणि सरकारी अधिकारी यांच्यासमवेत या संदर्भात बैठक घेतली.

संपादकीय भूमिका

भारताला अप्रत्यक्ष त्रास देण्याचाही हा प्रयत्न आहे ! भारताने अमेरिकेवर दबाव आणून तिला यापासून परावृत्त केले पाहिजे !