
ब्रुसेल्स (बेल्जियम) – भारतातील पंजाब नॅशनल बँकेच्या कर्ज घोटाळ्यातील पसार आरोपी असणारा हिरे व्यापारी मेहुल चोकसी याला येथील पोलिसांनी अटक केली. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या आवाहनावरून ही अटक करण्यात आली. भारताने आता बेल्जियममधून चोकसी याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया चालू केली आहे. चोकसीवर १३ सहस्र ८५० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.