पाकमध्ये मंदिर तोडणार्‍यांपैकी ११ मौलवींना न्यायालयाने ठोठावलेला दंड हिंदु कौन्सिलने भरला !

पाकिस्तानमधील हिंदूंच्या या दैन्यावस्थेवर भारत सरकार काहीच भूमिका घेत नाही, हे आश्‍चर्यकारक आहे. आता भारतातील हिंदूंनीच संघटित होऊन  पाकिस्तानला यासंदर्भात जाब विचारण्यासाठी भारत सरकारला बाध्य केले पाहिजे !

संयुक्त अरब अमिरातच्या राजकन्येच्या तीव्र विरोधानंतर ‘झी न्यूज’चे राष्ट्रनिष्ठ संपादक सुधीर चौधरी यांना कार्यक्रमातून वगळले !

राजकन्येकडून सुधीर चौधरी यांची ‘असहिष्णु’ आणि ‘आतंकवादी’ अशा शब्दांत हेटाळणी !

(म्हणे) ‘चीनला दक्षिणपूर्व आशियावर वर्चस्व नको ! – चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग

चीनच्या राष्ट्रपतींच्या या बोलण्यावर लहान मुल तरी विश्‍वास ठेवील का ?

‘आंचिम’ला नवीन उंचीवर नेणार ! – अनुराग ठाकूर, केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री

५२ व्या ‘आंचिम’मध्ये ‘इंडियन पॅनोरामा’ विभागाच्या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी आपण सर्वांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला नवीन उंचीवर नेऊ शकतो असा विश्वास व्यक्त केला.

पाकिस्तानच्या ग्वादर शहरात शेकडो स्थानिक लोकांकडून ‘चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्गा’च्या विरोधात निदर्शने

चीनने येथील ग्वादर बंदर विकासासाठी कह्यात घेतल्यामुळे येथील मासेमार्‍यांच्या व्यवसायावर मोठे संकट आले आहे.

बांगलादेशात हिंदूंच्या मंदिरात कुराण ठेवण्याच्या प्रयत्नात असणार्‍या धर्मांधाला अटक

हिंदूंना असहिष्णु ठरवणारे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी याविषयी बोलतील का ?

पाकिस्तानमध्ये ११ वर्षांच्या हिंदु मुलाची लैंगिक शोषण करून हत्या

पाकमधील असुरक्षित हिंदू ! याविषयी काँग्रेसचे नेते का बोलत नाहीत ?

ब्रिटनमध्ये गायीच्या शेणापासून वीजनिर्मिती !

गायीच्या शेणापासून आता वीजनिर्मिती केली जात आहे. ब्रिटनमधील शेतकर्‍यांनी गायीच्या शेणापासून वीजनिर्मिती करण्याचा पर्याय शोधला आहे. ब्रिटिश शेतकर्‍यांनी गायीच्या शेणापासून एक पावडर सिद्ध केली आहे.

नेदरलँडमध्ये कोरोनाविषयीच्या निर्बंधांच्या विरोधात नागरिकांचे हिंसक आंदोलन

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर नेदरलँडमध्ये कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांनी आंदोलन चालू केले आहे. या आंदोलनाच्या वेळी हिंसाचार झाल्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला.

पाकमधील बलात्कार्‍यांना नपुंसक करण्याची शिक्षा असणारा कायदा अवघ्या २४ घंट्यांत रहित !

इस्लाममध्ये दोषीला थेट ठार मारण्याची कठोर शिक्षा असतांना या शिक्षेला विरोध अनाकलनीय !