Take Action against Lalu Prasad Yadav : लालू प्रसाद यादव यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समिती

लालू प्रसाद यादव

मुंबई – महाकुंभमेळ्यासारख्या वैश्‍विक महोत्सवाला ‘फालतू’ म्हणणारे माजी केंद्रीय रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांनी कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. हिंदु जनजागृती समिती या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध करत असून यादव यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सरकारकडे करत आहे, असे प्रसिद्धीपत्रक समितीच्या वतीने प्रसारित करण्यात आले आहे.

प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, यादव यांनी कधीही अन्य धर्मियांच्या तीर्थयात्रांसंदर्भात अशा प्रकारचे अपमानास्पद वक्तव्य केले आहे का ? हिंदु धर्म आणि त्यांच्या श्रद्धास्थानांचा अपमान करण्याची ही प्रवृत्ती हिंदु समाज सहन करणार नाही. अनेक वर्षे तुरुंगात काढल्यानंतरही अपराधांविषयी खंत वाटत नसलेले यादव जामिनावर बाहेर असतांना ते हिंदु समाजाच्या श्रद्धास्थानांचा अपमान करणारी वादग्रस्त विधाने करत असतील, तर हा समाजात तेढ निर्माण करण्याचा आणि हिंदूंच्या भावना भडकावण्याचा प्रयत्न आहे. याची सरकारने गंभीर दखल घेतली पाहिजे.