लव्ह जिहादचा प्रतिकार करणार्‍या उत्तराखंडमधील हिंदु संघटना आणि प्रशासन यांची कणखर भूमिका !

‘लव्ह जिहाद’वरील वाद वाढत असतांना उत्तराखंडमधील हिंदु जागरण मंच, रुद्र सेना आणि वैदिक मिशन यांसारख्या हिंदुत्वनिष्ठ संघटना धर्मांतर अन् हिंदु महिलांच्या शोषणाच्या मोहिमेला आळा घालण्यासाठी सक्रीयपणे काम करत आहेत. या संस्थांनी आतापर्यंत ६०० हून अधिक मुलींची ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणांतून सुटका केली आहे. या संस्थांनी असुरक्षित हिंदूंचे संरक्षण करण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आवाहन प्रशासनाला केले आहे.

उत्तराखंडची राजधानी डेहरादून आणि आसपासच्या भागात ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या ठिकाणी तरुण आणि समाज यांपासून वंचित अन् कमकुवत गटातील हिंदु मुलींना धर्मांतर करण्याच्या उद्देशाने शारीरिक संबंधांचे आमीष दाखवले जाते. या प्रकारांचा प्रतिकार करण्यासाठी अनेक हिंदु संघटनांनी असुरक्षित मुलींचे संरक्षण आणि बळजोरीने होणारे धर्मांतर रोखण्यासाठी काही उपक्रम चालू केले आहेत. हिंदु जागरण मंच, रुद्र सेना आणि वैदिक मिशन या संस्थांनी लव्ह जिहादचा वाढता विळखा लक्षात घेऊन त्यांच्या स्वयंसेवकांना या संपूर्ण प्रदेशात पाठवले आहे.

१. रुद्र सेनेने केली ३८ मुलींची सुटका !

उत्तराखंड येथील मुसलमान पुरुष हिंदु मुलींना, विशेषतः जौनसार बावर आदिवासी पट्ट्यातील मुलींना लक्ष्य करत आहेत. वंचित आणि अल्पवयीन मुलींना शारीरिक संबंध ठेवण्यास बाध्य करण्यासाठी बनावट ओळख अन् विविध कारस्थाने करत आहेत. या मुलींना त्यांच्या दुष्ट योजनांमध्ये अडकवल्यानंतर, त्यांचे गैरवर्तन करणारे अश्लील व्हिडिओ चित्रीत करतात. त्यांना धमक्या देतात (ब्लॅकमेल करतात) आणि अखेरीस त्यांना इस्लाममध्ये धर्मांतर करण्यास भाग पाडतात.

‘गेल्या अडीच वर्षांत रुद्र सेनेने ३८ मुलींची ‘लव्ह जिहाद’च्या तावडीतून यशस्वीरित्या सुटका केली आहे. या मुलींचे त्यांच्या कुटुंबियांशी पुनर्मिलन झाले. या प्रकरणी पोलिसांत प्रथमदर्शनी अहवालही नोंद करण्यात आले आहेत. या प्रकरणांमध्ये अडकलेल्या बर्‍याच मुलींना डेहराडूनमधील पशवादून, उत्तरप्रदेश आणि हिमाचल प्रदेश यांसारख्या भागांत नेऊन तिथे त्यांचे लैंगिक शोषण केले जाते’, असे रुद्र सेनेचे नेते श्री. राकेश तोमर उत्तराखंडी यांनी सांगितले.

२. वैदिक मिशनकडून ४ पीडितांसाठी न्यायालयीन लढा

‘डेहरादूनच्या पशवादून प्रदेशात अशा किमान ४३ घटना घडल्या आहेत. त्यांपैकी अनेक प्रकरणे सध्या कायदेशीर छाननीखाली आहेत. आम्ही ४ गरीब मुलींच्या वतीने न्यायालयात सक्रीयपणे लढत आहोत. मुसलमानांनी या मुलींना लग्नाचे आमीष दाखवून त्यांचा शारीरिक उपभोग घेतला. अशा परिस्थितीत केवळ अल्पवयीन मुलीच नव्हे, तर प्रौढ स्त्रियाही फसवल्या जातात आणि ‘लव्ह जिहाद’मध्ये त्या फसतात. लव्ह जिहादच्या ज्या प्रकरणांमध्ये पोलीस तक्रार होत नाही, ती प्रकरणे मुली बेपत्ता झाल्याच्या तक्रारी नोंद झाल्यामुळे धारिकेमध्ये लपलेली आहेत. पुरेशा अन्वेषणाच्या अभावी या धारिका बंद करण्यात आल्या आहेत. लव्ह जिहादच्या पीडितांना लाभ देणार्‍या या हरवलेल्या मुलींना एकतर बळजोरीने धर्मांतर करण्यास भाग पाडले गेले असेल किंवा त्या मानवी तस्करीला फसल्या असतील’, अशी वैदिक मिशनमधील श्री. जगद्वीर सैनी यांनी व्यक्त केली आहे.

३. हिंदु जागरण मंचने दिले कायदेशीर साहाय्य !

हिंदु जागरण मंचचे प्रतिनिधी श्री. मुकेश आनंद म्हणाले, ‘गेल्या दशकात त्यांच्या संघटनेने ‘लव्ह जिहाद’च्या ५८५ प्रकरणांना विरोध केला आहे. पीडितांपैकी बहुतांश मुली अल्पवयीन होत्या आणि त्यांना त्यांच्या कुटुंबियांशी पुन्हा जोडण्यात, तसेच त्यांना कायदेशीर साहाय्य पुरवण्यात संस्थेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.’

४. बाल हक्क संरक्षण आयोग आणि महिला आयोगाने व्यक्त केली चिंता !

‘राज्य बाल हक्क संरक्षण आयोगा’च्या अध्यक्षा डॉ. गीता खन्ना यांनी उत्तराखंडमधील पालटत्या लोकसंख्येविषयी चिंता व्यक्त केली. अल्पवयीन हिंदु मुलींना लक्ष्य करण्यात राज्याबाहेरील अनेक मुसलमान पुरुषांचा सहभाग असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यांच्या आयोगानेही अशी अनेक प्रकरणे हाताळली आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षा कुसुम कांडवाल यांनी ‘लव्ह जिहाद’चा वाढता कल मान्य केला आहे. धार्मिक बळजोरी किंवा मानवी तस्करीची शक्यता लक्षात घेऊन हरवलेल्या महिलांच्या प्रकरणांचे सखोल अन्वेषण करण्याचे निर्देश त्यांच्या कार्यालयाने पोलिसांना दिले आहेत.

 

५. पोलीस आणि प्रशासन यांची कणखर भूमिका

उत्तराखंडचे पोलीस महासंचालक (डीजीपी) अभिनवकुमार यांनी लव्ह जिहाद होत असल्याचे मान्य केले आहे. ‘लव्ह जिहादमध्ये सहभागी असलेल्या गुन्हेगारांवर विशेषतः लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) करणार्‍या कायद्यांतर्गत, पोलीस कठोर कारवाई करत आहेत. इतर समुदायातील व्यक्तींकडून अल्पवयीन मुलींच्या शोषणाची अनेक प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि पोलिसांनी योग्य कायदेशीर कारवाई करून प्रतिसाद दिला आहे’, असे अभिनवकुमार यांनी म्हटले आहे.

६. मुख्यमंत्र्यांची लव्ह जिहादविषयी कठोर भूमिका

‘उत्तराखंडमध्ये ‘लव्ह जिहाद’ आणि ‘लँड जिहाद’च्या घटना सहन केल्या जाणार नाहीत’, असे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी घोषित केले आहे. ‘अशा प्रकारच्या गुन्ह्यात गुन्हेगारांना त्वरित आणि गंभीर कायदेशीर परिणामांना सामोरे जावे लागेल’, अशी चेतावणी पुष्कर सिंह धामी यांनी दिली आहे.

(साभार : साप्ताहिक ‘ऑर्गनायझर’)

संपादकीय भूमिका

लव्ह जिहादच्या विरोधात उत्तराखंडमधील हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि प्रशासन यांनी प्रयत्न केले, तसे प्रयत्न भारतभरात व्हायला हवे !