(म्हणे) ‘पितृपक्षातील जेवण पशू-पक्ष्यांसाठी हानीकारक !’ – पशूवैद्य डॉ. हृदेश शर्मा

कथित प्राणीप्रेमी, तसेच पशूवैद्य डॉ. हृदेश शर्मा यांचे फुकाचे विधान

ठाणे – पितृ पंधरवड्यात कावळ्यांसह इतर पशू-पक्ष्यांना दिले जाणारे जेवण त्यांच्या आरोग्याला हानीकारक ठरू शकते, असे विधान प्राणीप्रेमी, तसेच पशूवैद्य डॉ. हृदेश शर्मा यांनी केले आहे.

‘पशू-पक्ष्यांसाठी अल्प प्रमाणात शिजवलेले अन्न ठेवावे. शिजवलेले अन्न हे मानवासाठी असते; पण पशू-पक्ष्यांना ते पचनी पडेल कि नाही, याविषयी संशोधन झालेले नाही. असे खाद्यपदार्थ दिल्यास त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. पितृपक्षातील परंपरेचे पालन करतांना मुक्या जिवांचा विचार केला पाहिजे. कावळ्याला केवळ घासभर इतकेच अन्न ठेवले पाहिजे. तळलेले किंवा फोडणीचे पदार्थ देऊ नयेत’, असेही त्यांचे म्हणणे आहे.

पिंडदान आणि कावळ्याचे महत्त्व !

‘काकगती’

श्राद्धविधीत कावळा हा एक माध्यम असतो. हिंदु धर्माने सांगितलेल्या ४ ऋणांमध्ये पितृऋणाचाही समावेश आहे. कावळ्याला विशेष दृष्टी लाभली आहे. त्यामुळे पितृपक्षात त्याच्यासाठी जेवण म्हणून खाद्यपदार्थ ठेवले जातात. अध्यात्मशास्त्रानुसार, ‘काकगती’ ही पिंडदानात केलेल्या आवाहनानुसार पृथ्वीच्या वातावरणकक्षेत येणार्‍या लिंगदेहाच्या गतीशी साधर्म्य दर्शवते. लिंगदेह कावळ्याच्या देहात प्रवेश करून पिंडातील अन्नभक्षण करतात. त्यातून लिंगदेहाची तृप्ती होते आणि त्या अन्नातून मिळालेल्या ऊर्जेमुळे त्याला पुढील प्रवासासाठी आंतरिक बळ प्राप्त होते. पितरांसाठी ठेवण्यात येणार्‍या जेवणाकडे केवळ स्थूल दृष्टीने न पहाता त्यामागील सूक्ष्म पैलूही जाणून घ्यायला हवेत !

संपादकीय भूमिका

  • कावळे, तसेच अन्य जनावरे केवळ पितृपक्षातच नव्हे, तर अन्य वेळीही कचरापेटी किंवा घराच्या बाहेर टाकलेले अन्नपदार्थ खातात. त्या वेळी अशा प्राणीप्रेमींना पशू-पक्ष्यांच्या प्रकृतीची काळजी वाटत नाही का ? हिंदूंच्या धार्मिक विधींची हेतूपुरस्सर अपकीर्ती करण्याचे हे षड्यंत्र आहे !
  • अशांना प्राणीप्रेमाचा असा उमाळा कधी बकरी ईदनिमित्त कापण्यात येणार्‍या बकर्‍यांविषयी आला आहे का ?