दिवाळीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मांसाहार आणि मद्य ठेवल्याचे प्रकरण
लंडन (ब्रिटन) – ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी दिवाळी निमित्ताने त्याच्या १० डाउनिंग स्ट्रीट येथे कार्यक्रम आयोजित केला होता. यात हिंदु समुदायातील प्रमुख व्यक्ती, तसेच राजकीय नेते सहभागी झाले होते. या कार्यक्रमाच्या वेळी ठेवण्यात आलेल्या खाद्यपदार्थांमध्ये मांसाहार आणि मद्य होते. यावरून येथील हिंदु संघटनांनी पंतप्रधानांवर टीका केली होती. आता या प्रकरणी पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून हिंदूंची क्षमा मागण्यात आली आहे. भारतीय वंशाच्या खासदार शिवानी राजा यांनी औपचारिकपणे पंतप्रधान स्टार्मर यांना लिहिलेल्या पत्रात दिवाळी कार्यक्रमातील काही पदार्थांविषयी आक्षेप नोंदवला होता.
स्टार्मर यांच्या कार्यालयातील प्रवक्त्याने सांगितले की, हिंदु समुदायाच्या भावना समजून घेत भविष्यातील कार्यक्रमात असे पुन्हा घडणार नाही. आम्ही हिंदूंच्या भावनांची शक्ती जाणतो.