Prayagraj Kumbh Parva 2025 : मोनालिसासमवेत छायाचित्र काढण्यासाठी तरुणांची गर्दी !

प्रयागराज कुंभपर्व २०२५

प्रयागराज, १ फेब्रुवारी (वार्ता.) – कुंभमेळ्यासाठी कोट्यवधी भाविक प्रतिदिन येथे येत आहेत. अमृतस्नान करण्याच्या हेतूने येणारे अनेक भाविक आहेत; परंतु काही जण केवळ मौज-मजा करण्यासाठी येथे आले आहेत, असे दिसून येत आहे. सामाजिक माध्यमांवर प्रसिद्धी मिळालेली माळा विकणारी तरुणी मोनालिसा हिला पहाण्यासाठी आणि तिच्यासमवेत सेल्फी (स्वतःचे स्वतः किंवा अन्यांसोबत स्वतःच छायाचित्र काढणे) काढण्यासाठी तरुणांची गर्दी होत आहे.

माळा विकणारी तरुणी मोनालिसा

काही तरुणांनी ‘‘आम्ही कुंभमेळ्यात केवळ मोनालिसाला पहाण्यासाठी आले होतो’’, असे सामाजिक माध्यमांवर सांगितले आहे.

संपादकीय भूमिका

कुंभमेळा हा अमृतस्नान करून पापमुक्त होणे, साधू-संताचे भावपूर्ण दर्शन घेणे, तसेच आध्यात्मिक लाभ करून घेणे यांसाठी आहे. सध्याच्या तरुणांना धर्मशिक्षण नसल्याने त्यांच्याकडून अशा अयोग्य कृती होत असल्याचे दिसून येत आहे !