हिंदूंना धर्मशिक्षण न मिळाल्याचा परिणाम !

देहलीच्या तिहार कारागृहामध्ये ११० हिंदु बंदीवान मुसलमान बंदीवानांसमवेत रोजा ठेवत असल्याचे समोर आले आहे. त्यात ३१ हिंदु महिला आणि १२ हिंदु तरुण यांचाही समावेश आहे.

इंदूर (मध्यप्रदेश) येथील प्रसिद्ध गणेश मंदिरातील मूर्तीला भाजपच्या झेंड्याचा रंग असणारे वस्त्र नेसवले

हिंदूंना तसेच, ‘हिंदुत्वनिष्ठ’ असल्याचे सांगणाऱ्या भाजपच्या नेत्यांना अन् कार्यकर्त्यांना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हेच यातून लक्षात येते ! धर्मशिक्षण नसणारे असे पक्ष कधीतरी हिंदुत्वाचे कार्य करू शकतील का ?

(म्हणे) ‘रामायण आणि महाभारत यांतही हिंसा आहे; मग ‘हिंदू हिंसक नसतात’, असे कसे म्हणणार ?’ –  सीताराम येच्युरी

ज्या साम्यवाद्यांचे हात निरपराध लोकांच्या रक्ताने बरबटलेले आहेत, त्यांना ‘हिंदू हिंसक आहेत कि नाहीत ?’, हे बोलण्याचा काय अधिकार ? सत्ता, अधिकार यांसाठी सामान्यांची क्रूर हत्या करणार्‍या साम्यवाद्यांनी ‘अशी हत्या करण्याची शिकवण कुठल्या पुस्तकातून मिळाली’, हे प्रथम सांगावे !

गोवेली (कल्याण) येथील हनुमान मंदिरात गावकर्‍यांनी केक कापून केली धर्महानी !

पाश्‍चात्त्य संस्कृतीचा इतका प्रचंड पगडा भारतियांवर पडला आहे की, त्यातून त्यांच्या देवताही सुटलेल्या नाहीत. मंदिरामध्ये केक कापण्यासारखी अधार्मिक कृत्ये केल्याने मंदिराचे पावित्र्य अल्प होते, हे हिंदूंना धर्मशिक्षणाअभावी लक्षात येत नाही.

(म्हणे) ‘साध्वी प्रज्ञासिंह यांनी मसूद अझहर याला शाप दिला असता, तर सर्जिकल स्ट्राईक करावाच लागला नसता !’ – काँग्रेस नेते दिग्विजय सिंह

जर साध्वी प्रज्ञासिंह किंवा अन्य कोणत्याही संतांना खरेच शाप द्यायचा असेल, तर तो भारतातील देशद्रोह्यांच्या नाशासाठी देतील आणि नंतर असे प्रश्‍न करणारे कोणी शिल्लकच रहाणार नाहीत !

काँग्रेसवाल्यांची वाचाळ बडबड लक्षात घ्या !

जर साध्वी प्रज्ञासिंह यांनी दिलेल्या शापात सामर्थ्य असते, तर त्यांनी मसूद अझहर याला शाप द्यायला हवा होता; म्हणजे भारताला सर्जिकल स्ट्राईक करण्याची आवश्यकताच भासली नसती, असे विधान काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी केले.

साध्वी प्रज्ञा सिंह अजहर मसूद को शाप देती तो सर्जिकल स्ट्राइक न करनी पडती ! – दिग्विजय सिंह

सर्जिकल स्ट्राइक पर सवाल उठानेवाले अब ये क्यों बोल रहे हे ?

‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेत सरकारकडूनच लिंगभेद ?

मुलगा-मुलगी असा भेद करणे कायद्याने गुन्हा असला, तरी राज्य सरकारच असा लिंगभेद करत असल्याचा दावा बोर्‍हाडे यांनी केला आहे.

साध्वी प्रज्ञासिंह यांच्या शापाने कोणाला मरतांना पाहिलेले नाही ! – माजी सरकारी अधिवक्त्या रोहिणी सालियन

साध्वी प्रज्ञासिंह यांनी असे विधान निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर केलेले नाही, तर यापूर्वीही अनेकदा जाहीरपणे आणि प्रसारमाध्यमांच्या मुलाखतींमध्ये त्यांनी असेच सांगितले आहे. ‘आंधळ्याला दिसत नाही; म्हणून सृष्टी नाही’, असे कधी म्हणता येईल का ?

कोल्हापूर शहरातील एका हनुमान मंदिरात केक कापून हनुमान जयंती साजरी !

केक कापणे ही पाश्‍चात्त्य संस्कृती असून अशा कृत्यांमुळे आपण भारतीय संस्कृतीचे हनन करत आहोत, हेही भक्तांच्या लक्षात येत नाही. तसेच फुगे लावण्यासारख्या कृतींमुळे मंदिरातील सात्त्विकता आणि चैतन्य अल्प होते. यावरून हिंदूंना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हे लक्षात येते !


Multi Language |Offline reading | PDF