चीनसाठी हेरगिरी करणार्‍या कॅनडाच्या माजी अधिकार्‍याला अटक

जगातील अनेक महत्त्वाच्या देशांमध्ये चीनच्या कारवाया चालू असून तो केवळ भारतासाठी नाही, तर जगासाठी धोकादायक बनला आहे, हेच खरे !

अण्वस्त्रांद्वारे आक्रमण केल्यास हुकूमशाह किम जोंग यांची राजवट संपवू !

उत्तर कोरियाने २२ जुलै या दिवशी पिवळ्या (यलो) समुद्रात अनेक क्रूझ क्षेपणास्त्रे डागल्याने उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यातील तणावात वाढ झाली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात २४ जुलैपर्यंत अतीमुसळधार पावसाची चेतावणी

पावसामुळे आतापर्यंत जिल्ह्यात १ व्यक्तीचा, तर ४ गुरांचा मृत्यू झाला आहे. ६ सार्वजनिक मालमत्तांची हानी झाली आहे. पुराचे पाणी घरात घुसल्याने सध्या ३९ कुटुंबे स्थलांतरित करण्यात आली आहेत.

भारतीय रेल्वेकडून हलाल प्रमाणपत्र असलेला चहा दिल्याचा संतापजनक व्हिडिओ प्रसारित !

धर्मनिरपेक्ष भारतातील रेल्वे मंडळ ही सरकारी संस्था हलाल प्रमाणपत्र असलेला चहा विकतेच कसा ? यासाठी उत्तरदायी असलेल्या सरकारी अधिकार्‍यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !

पणजी ‘स्मार्ट सिटी’ची आतापर्यंत ३३ टक्के कामेच पूर्ण ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

विरोधक सातत्याने ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पावरून पणजी शहराला नावे ठेवत असल्याने त्रस्त झालेले मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, ‘‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाची १०० टक्के कामे पूर्ण झाल्यावर पणजी शहर ‘स्मार्ट’ दिसेल. चालू वर्षअखेरपर्यंत ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाची सर्व कामे पूर्ण होणार आहेत.

(म्हणे) ‘वन्दे मातरम्’ म्हणणार नाही, आम्ही केवळ ‘अल्ला’पुढे मस्तक झुकवतो !’-अबू आझमी

‘वन्दे मातरम्’ हे कोट्यवधी देशवासियांचे श्रद्धास्थान आहे. ‘वन्दे मातरम्’ कोणत्याही एका धर्माचे नाही. ते धार्मिक गीत नाही. राज्यघटनेने ‘वन्दे मातरम्’ला राष्ट्रीय गीताचा दर्जा दिला आहे.

मोगरा नाल्यावरील अतिक्रमणाची चौकशी करून कारवाई करू ! – उदय सामंत, उद्योग मंत्री

मोगरा नाल्याचे बांधकाम हे महानगरपालिकेने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार केले आहे. ते जर चुकीच्या पद्धतीने केले गेले आहे, तर महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांवर तसेच ठेकेदारांवर कारवाई करणार का ?

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस : चिपळूणसह जिल्ह्यातील पूरस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा 

वाशिष्ठीचे पाणी वाढले असल्यामुळे खबरदारीच्या उपाययोजना म्हणून आवश्यक त्या ठिकाणी नागरिकांचे तातडीने स्थलांतर करावे, तसेच पुरामुळे बाधित नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा तातडीने पुरवठा करण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या.

तीर्थक्षेत्रे मद्य-मांस मुक्त करण्यासाठी अधिवेशन झाल्यानंतर बैठक बोलवू ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

श्री. सुनील घनवट यांनी मुख्यमंत्र्यांना पंढरपूर येथे झालेल्या वारकरी महाअधिवेशनामध्ये सर्व तीर्थक्षेत्रे मद्य-मांस मुक्त करण्याची, तसेच मंदिर विश्वस्त आणि गड-दुर्ग यांच्या संदर्भात गडप्रेमी संघटनांची बैठक बोलवण्याची मागणी केली.

ग्राहकांनी वीजदेयकात मिळणार्‍या सवलतींचा लाभ घ्यावा !

देवेंद्र फडणवीस यांनी वीज ग्राहकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि ग्राहकाभिमूख सेवा देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार अधिकाधिक ग्राहकांना वीजदेयकांतील सवलतीचा लाभ मिळवून देण्यासाठी महावितरणने पुढाकार घेतला आहे.