|
पनवेल – येथील सनातनच्या साधिका सौ. पूर्वा कुलकर्णी यांनी त्यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त तिच्या शाळेत, म्हणजे आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके विद्यालयात सनातन संस्थेने प्रकाशित केलेली बालसंस्कारविषयीची ग्रंथमालिका ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या अंतर्गत भेट दिली.
शाळेच्या मुख्याध्यापिका, वर्गशिक्षिका आणि ग्रंथालय शिक्षक यांना हा उपक्रम आवडला. ‘बालसंस्कारविषयीचे सर्वच ग्रंथ चांगले आणि काळानुसार उपयुक्त आहेत. शिक्षक आणि विद्यार्थी यांना हे ग्रंथ वाचनासाठी उपलब्ध करून देऊ. खेळणी किंवा खाऊ अशी भेट देण्यापेक्षा ही चिरंतन टिकणारी भेट आहे’, असे त्या सर्वांनी सांगितले.
‘सुसंस्कार आणि चांगल्या सवयी’, ‘अभ्यास कसा करावा ?’, ‘बोधकथा’, ‘टीव्ही, मोबाईल, इंटरनेट यांचे तोटे टाळून लाभ मिळवा !’, ‘राष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा !’, ‘स्वभावदोष घालवा, आनंदी व्हा !’, ‘दोष घालवा, गुण जोपासा !’ अशी त्या ग्रंथांची नावे आहेत.