ओटावा – कॅनडामध्ये ६० वर्षीय निवृत्त पोलीस अधिकारी विलियम मैजशर यांना अटक करण्यात आली आहे. कॅनडाच्या ‘रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलीस’ने (‘आर्.सी.एम्.पी.’ने) म्हटले आहे की, राष्ट्रहिताच्या दृष्टीने संवेदनशील आणि गोपनीय माहिती चीनला पुरवल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. देशाच्या विरोधात कट रचल्याच्या प्रकरणात त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मैजशर यांच्या हालचालींवर वर्ष २०२१ पासून देखरेख ठेवण्यात आली होती.
A Retired R.C.M.P. Officer Is Charged With Spying For Chinahttps://t.co/KLtt2Bswo1
— Jaun News English (@EnglishJaun) July 22, 2023
मागील काही वर्षांपासून चीन आणि कॅनडा यांच्यातील संबंध बिघडले आहेत. मार्च मासामध्ये कॅनडाचे राष्ट्रपती जस्टिन ट्रुडो यांनी कॅनडामधील निवडणुकांमध्ये चीनच्या वाढत्या हस्तक्षेपाविषयी चौकशी करण्याचा आदेश दिला होता. यावर्षीच्या मे मासामध्ये कॅनडाने तेथे कार्यरत असलेले चीनचे वाणिज्य राजदूत झाओ वेई यांची कॅनडातून हकालपट्टी केली होती. कॅनडाच्या राजकारणामध्ये हस्तक्षेप करण्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. चीनने या आरोपात तथ्य नसल्याचे म्हटले होते.
संपादकीय भूमिकाजगातील अनेक महत्त्वाच्या देशांमध्ये चीनच्या कारवाया चालू असून तो केवळ भारतासाठी नाही, तर जगासाठी धोकादायक बनला आहे, हेच खरे ! |